ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुक करणारे गुन्हेगार जेरबंद

Uncategorized

विरार पोलीस ठाणे हद्दीत ए.टी.एम सेंटरमध्ये ग्राहकांना मदत करण्याचे बहाण्याने हातचलाखीने कार्ड बदलुन फसवणुकीचे गुन्हयांचे घटनांना आळा आलण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.दत्तात्रय शिंदे, यांचे सुचने प्रमाणे श्री.विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक वसई, श्रीमती.रेणुका बागडे, उपविभागिय पोलीस अधिकारी, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाणे नेमणुकीतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक तयार करुन गुप्त बातमीदाराचे मदतीने आरोपी १) रोहीत मृदुल कुमार पांडे वय २८ वर्षे रा- रूम नं. ०३, यादव नगर, पंकड यादव चाळ, संतोषभुवन नालासोपारा पुर्व मुळ राह- बडरखुर्द गाव, पोस्ट- हरीया, जिल्हा बस्ती राज्य उत्तरप्रदेश २) प्रदयुम राधेश्याम यादव वय २१ वर्षे रा- रूम नं. ०५, सिताराम हॉटेल, वलई पाडा, संतोषभुवन नालासोपारा पुव मुळ राह- जौनपुर, करीकत, परमांनंदपुर, उत्तरप्रदेश यांना दिनांक १६/०९/२०२० रोजी १८.५६ वा. अटक करण्यात आली आहे. आरोपी यांनी ए.टी.एमचे सहाय्याने काही वस्तु खरेदी केल्या व रोख रक्कम काढुण घेतली आहे. त्याप्रमाणे आरोपी यांचेकडुन १,५१,६००/- रू कि.चे टीव्ही, एसी होमथेटर, सोन्याची अंगठी, व कॅमेरा हे जप्तकेले आहे व तसेच ८३,०००/- रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपी यांचेकडुन विरार व माणिकपुर पोलीस ठाण्यातील खालील गुन्हे उघडकीस आणले आहे. सदर गुन्हे उघडकीस आणनेकामी सायबर सेल पालघर येथील पोउपनिरी/सिध्देश शिंदे व पोशि/दुर्गेष्ट, पोशि/गव्हाणे, पोशि/चव्हाण, पोशि/पाटील यांनी मदत केलेली आहे.
सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक श्री.विवेक सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक संदेश राणे, सफौ/राजेश वाघ, पो.हवा./सचिन लोखंडे, पो.ना./सचिन घेरे, पो.ना./विजय दुबळा, पो.ना/हर्षद चव्हाण, पो.ना./भुषण वाघमारे, पो.शि./इंद्रनिल पाटील, पोशि/विशाल लोहार, पो.शि./सुमित जाधव, पो.शि/रवी वानखडे, पो.शि./ सुनिल पाटील यांनी केली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply