सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार दिनांक ११/०३/२०२१ रोजी रात्री ०३.०० वाजताचे दरम्यान वालीय पोलीस ठाण्यात एक अनोळखी महिलेचा फोन आला व तिने कळविले की, फादरवाडी नाका येथील बँक ऑफ इंडिया चे एटिएम मधुन काहीतरी तोडण्याचा आवाज येत आहे.
सदरची माहीती मिळताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन वालीव पोलीस ठाण्याचे रात्रौ गस्ती करीता असलेले स.पो.नि. ज्ञानेश फडतरे व पोलीस ठाण्यात रात्री गस्त अंमलदार असे लागलीच फादरवाडी नाका येथील बँक ऑफ इंडिया चे ए.टिम.एम. जवळ गेले. माहीती मिळालेले सदरचे एटिएम हे बाहेरुन बंद होते व आतुन ए.टि.एम. मशीन तोडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी नमुद पोलीस पथकाने सदर आरोपीस कौशल्यपुर्ण विश्वासात घेऊन त्यास शरण येण्यास भाग पाडल्याने तो त्याचे जवळील ड्रिल मशील, हातोडा, छन्नी सह पोलीसांना शरण आला.
पोलीस व जागरुक अनोळखी महीलेच्या सतर्कतेमुळे सदर एटिएम मशीन मधुन मोठया प्रमाणात पैसे चोरुन नेण्याचे चोराचे मनसुबे उधळुन लावण्यात पोलीसांना यश आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नांव सलीम ननुवा मन्सुरी वय २६ वर्षे रा. रु.नं.०३, विठ्ठल जिना चाळ, बोरीवली पुर्व, मुंबई मुळ रा.ग्राम कोट कादर, ठाणे रायपुर ता.नगीना जि.बिजनोर राज्य-उत्तर प्रदेश असे असुन सदर घटनेच्या अनुषंगाने वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २६७/२०२१ भारतीय दंड संहिता कलम ३७९,५११,४२७ प्रमाणे गुन्हयाची नोंद करुन पुढील तपास पोना/सानप हे करीत आहे.
वरील कामगीरी मा.श्री.प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त सो, परीमंडळ-३ विरार, श्री.अमोल मांडवे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो, तुळीज विभाग, बालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विलास चौगुले, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण शाखेचे, सपोनि/ज्ञानेश फडतरे, सहा.फौज/संजय गुरव, आणि पथक यांनी यशस्वीरित्या कामगीरी पार पाडली आहे.
