मिरारोड : अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे त्यांची विक्री करणारे हे वाढले असून ते लपूनछपून आपला व्यवसाय करत असतात त्यातच मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांना दिनांक १४/०९/२०२१ रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, मिरारोड (पुर्व), रेल्वे स्टेशन जवळ सर्कल परिसरात एका व्यक्ती कडे एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ असून तो विक्रीसाठी याठिकाणी घेऊन येणार आहे.सदर मिळालेली बातमी वरिष्ठांना सांगून डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. दरम्यान सादक रशीद अन्सारी वय-१९ वर्षे, रा. एम. जे. अपार्टमेंट, रुम.क्र.०२, तळमजला, रहमत नगर, नगीनदासपाडा, विरार रोड, नालासोपारा (पुर्व) ता. वसई, यांच्याकडे एकुण ३७८.८ ग्रॅम वजनाचा एकुण १८,९४,५००/-रु. किंमतीचा एम.डी. (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ मिळाला असून त्याच्याकडील अंमली पदार्थ मॅफेड्रॉन जप्त करण्यात आला. नमुद आरोपीविरुध्द अंमली पदार्थ कायदयापमाणे नयानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असुन त्यास अटक करण्यात आली आहे व त्याचा अधिक तपास नयानगर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख सहा.पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक, श्री. देवीदास हंडोरे, सहा.पोलीस निरीक्षक विलास कुटे, पो.हवा. धनाजी इंगळे, पोना. पवन पाटील, पोशि. अजय यादव, पो.शि. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केली आहे.
