मिरारोड : दिनांक १८/०९/२०२१ रोजी मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे नयानगर पोलीस ठाणे या हद्दीत ७.१५ वा. चे सुमारास गस्त घालत असतांना मदिना हॉटेल च्या समोरील रोडवर एक व्यक्ति हालचाली करीत असलेला निदर्शनास आला त्यावेळी त्याला जावून त्याच्या जवळ जावून त्याची चौकशी केली असता त्याने आपली ओळख अश्पाक चाँद पाशा वय २१ वर्षे रा.नयानगर मिरारोड (पुर्व) असे संगितले त्याचा देहबोलीवरून काही तरी तो लपवत असेल्याचे दिसले त्यावेळी पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ५६,०००/- रुपये किंमतीचे१४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन एम.डी. नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. सदरचा एम. डी. कुणाकडून आणला याबाबत विचारपूस करता त्याने नयानगर येथील एका इसमाकडून घेतला असल्याबाबत माहिती दिली त्या माहितीच्या आधारे कानुंगो गार्डन परिसरात आदिल खलीकुल रहमान वय २५ वर्षे, रा. किणी कॉम्लेक्स, टिवरी रोड, नायगांव (पुर्व), यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचा कडे ४०,०००/- रुपये किंमतीचा १० ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ व १९०००/-रु. रोख रक्कम मिळून आली. वरील दोन्हीं आरोपींविरुध्द नयानगर पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नयानगर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास हंडोरे, पो.हवा. धनाजी इंगळे, पोना. पवन पाटील, पोशि. अजय यादव, पो.शि. ज्ञानेश्वर चव्हाण, पोशि. घरबुडे व पोशि. ईश्वर पाटील यांनी केली आहे.
