मिरारोड – नवघर पोलीस ठाणे अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांनी १२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ बाळगणा-या आरोपीस मिरारोड येथुन ताब्यात घेतले आहे. दिनांक ०७/०५/२०२२ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मिरारोड (पुर्व) दिपक हॉस्पीटल येथे एक ईसम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहे. सदर मिळालेल्या बातमीप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे अधिकारी सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन दिपक हॉस्पीटल येथे परिसरात सापळा रचुन कारवाई करून मजहर आमीन शेख याच्या जवळ असलेला १२ ग्रॅम वजनाचा ९६,०००/-रु. किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीकरीता बाळगला असताना मिळुन आला असुन त्याच्याकडुन नमुद अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. संपुर्ण कारवाई दरम्यान एकुण १,५१,०००/-रु. एकुण किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरूद्ध अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास नवघर पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक देवीदास हंडोरे, सपोनि विलास कुटे, पो.हवा./धनाजी इंगळे, पो.हवा./अजय सपकाळ, पो.हवा./सुभाष आव्हाड, पोहवा/ विष्णुदेव घरबुडे व पो.शि. /अजय यादव यांनी केली आहे.
