बोरिवली : एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे यांनी दहिसर नदिकिनारा, बोरिवली(प), येथून एका महिलेस हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेस आपल्या ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार मा.पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी मुंबई शहरात वाढत असलेल्या अंमली पदार्थांच्या विक्री ला आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकाची नियुक्ती करून अंमलीपदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीचा शोध घेवुन गुन्हयांना आळा घालण्यासाठी व समुळ नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली होती . त्याप्रमाणे मा.अप्पर पोलिस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, कांदिवली (पु), मुबई तसेच मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ११, मुंबई व मा. सहायक पोलीस आयुक्त, बोरिवली विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली व व. पो. नि. सुधीर कुडाळकर, एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे, मुंबई यांच्या देखरेखीखाली गुन्हे प्रकटीकरण पथक, निगराणी पथक व एटीसी पथक यांची स्वतंत्र पथके तयार करून त्यांना अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी कारवाई करण्याचे सांगितले होते .
त्याप्रमाणे दिनांक २३/०४/२२ रोजी गुन्हे प्रतिबंधक गस्ती दरम्यान गस्त करत असताना पोनि किरण सुरसे,सपोनि घोडके ,गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि संदिप साळवे तसेच मपोह मौळे, पो.शि/ सवळी, पोना /खोत व पो.शि. मोरे यांना ” सेंट फ्रांसिस शाळेजवळ, दहिसर नदिकिनारा, बोरिवली(प), मुंबई येथे यांना एक महिला संशयीत रित्या हातात एक पारदर्शक पिशवी घेऊन उभी असल्याची दिसली . सदर महिलेले पोलिसांना बघून त्या ठिकाणावून निघून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीस निरीक्षक किरण सुरसे, सपोनि घोडके, पोउपनि. साळवे व पोलीस पथकाने मपोह मौळे यांनी तीला शिताफीने ताब्यात घेतलेअसून तिला पिशवीत काय आहे हे विचारले असता ती पिशवी हि तिचीच असून त्यामध्ये हेरॉईन हा अंमली पदार्थ असून तो तिने विक्री करण्यासाठी आणला होता असे पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले .
अटक केलेल्या १)मुस्कान दिपक कनोजीया, वय-23 वर्षे, हिच्याकडून पोलिसांनी ३४५ ग्रॅम ची हेरॉईन एकूण रुपये ५१,७५,०००/- रु . मुद्देमाल जप्त केला असून तिला एम एच बी कॉ पोलीस ठाणे यांनी अंमलीपदार्थ विक्री करण्यासाठी आणल्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेस अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी महीलेचा अधिक कोणत्या गुन्ह्यात सहभाग आहे का तसेच नमूद महीलेचे इतर सहकारी मुंबई मध्ये आणखी कोणत्या ठिकाणी अंमलीपदार्थ विक्री करीत आहेत किंवा कसे याबाबत अधिक तपास करून इतर आरोपीत इसमांना अटक करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किरण सुरसे करत असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई मा. विरेंद्र मिश्रा अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई, मा. विशाल ठाकुर, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ११, मुंबई, मा. रेखा भवरे, सहा. पोलीस आयुक्त, बोरिवली विभाग, मुंबई व मा. सुधीर कूडाळकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एम एच बी कॉ पोलीस ठाणे, किरण सुरसे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बपु घोडके, गुन्हे प्रकटीकरण अधिकारि संदीप साळवे व पथकातील अंमलदार व पो.ह.क्र. / मौळे, पोना/ खोत , पो.शि/ सवळी व पो.शि. /मोरे यांनी पार पाडली.
