वालिव : एटीएम सेन्टर मधुन पैसे काढुन देण्याचा बहाणा करुन हातचालाखीने एटीएमची अदलाबदली करुन फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे . मिळालेल्या माहितीच्या आधारे मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यांपासुन एटीएम सेंन्टर मधुन पैसे काढुन देण्यासाठी मदतीचा बहाणा करुन हातचालाखीने एटीएम कार्डाची अदलाबदली करुन फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली होती. सदर घटनांची वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी गांभिर्याने दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन त्यांना वेळीच पकडण्यात यावे असे आदेश पोलिसांना दिले गेले होते .
त्याअनुषंगाने पोलीस उप आयुक्त (गुन्हे), सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष-३ विरारचे पोलीस पथक असे विविध गुन्हयाचे सि.सि.टि.व्ही. फुटेज व गुप्त बातमीदार यांच्या कडून मिळालेल्या माहितीवरुन आरोपीत नामे१) इरफान अब्बास अन्सारी वय २७ वर्षे, रा. नालासोपारा पुर्व, २) सुभाष अभिराम यादव वय २५ वर्षे, रा. नालासोपारा पुर्व, ३) अलि अहमद सलाम इद्रिसी अन्सारी वय ४० वर्षे, रा. भिवंडी, . ४) कमलेश भगवती सिंग वय ५० वर्षे, रा. नायगाव पुर्व, यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे विविध बँकेची ५४ ए.टी.एम. कार्ड मिळुन आली . तसेच सदर गुन्हा करण्यासाठी वापरण्यात येणारी ऑटोरिक्षा व १,२१,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरोपी यांच्याकडे मिळुन आलेल्या ए.टी.एम कार्डाची पडताळणी केली असता यांनी मिरा-भाईदर, वसईविरार पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर व मुंबई शहर हद्दीत अशाच प्रकारे अनेक गुन्हे केले असल्याची माहीती समोर आली आहे त्यानुसार आरोपी यांच्यावर पुढील कारवाई करीता वालीव पोलीस ठाणे गुन्हा रठेवण्यात आले असून त्यांचे कब्जात मिळुन आलेल्या विविध बँकेचे ए.टी.एम. कार्ड बाबत अधिक तपास पोलीस करीत आहे .
वरील कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे), मि.भा.वि.व पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि/ प्रमोद बडाख, पोउपनिरी/ शिवाजी खाडे, उमेश भागवत, पो.हवा/ अशोक पाटील, पो.ना/ मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारवकर, मनोज सकपाळ, शंकर शिंदे, सचिन घेरे, पो.अं./ राकेश पवार, अश्विन पाटील, सर्व नेम- गुन्हे शाखा, कक्ष -३ यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.
