वसई – आरोपीकडुन एक विदेशी पिस्तुल, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी जप्त करण्यात वालीव पोलीसांना यश. अधिक माहीतीनुसार वालीव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराज रणवरे यांना दिनांक ०३/०९/२०२३ रोजी रात्री बाराच्या सुमारास खैरपाडा, वसई परीसरात एक इसम अग्नीशस्त्र खरेदी – ब्रिकी करिता येणार असल्याची बातमीदाराकडुन माहीती मिळाली होती. सदर माहीतीची शहानिशा करुन पुढील कायदेशिर कारवाई करण्यासाठी मा. प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस ठाणे यांनी वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. सचिन सानप व पथकास आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बामतीदाराच्या मदतीने आरोपी रमेशकुमार सत्यप्रकाश यादव, वय २५ वर्षे, धंदा – मजुरी, रा. मुळगाव- रुकुनपुर, पोस्ट- बेलगहन, जि. जोनपुर, राज्य – उत्तरप्रदेश यास सापळा रचुन शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी पिस्तुल मॅगझीनसह, ४ जिवंत काडतुसे आणि १ गोळीबारा पश्चात उरलेली रिकामी पुंगळी असा एकुण रु. ५४ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगताना मिळुन आला व मा. पोलीस आयुक्त, मिरा-भाईदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांच्या कडील मनाई आदेशाचा भंग केला म्हणुन आरोपी विरुध्द वालीव पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा सह कलम ३७(१)(३),१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील कामगीरी श्रीमती पणिमा श्रींगी – चौगुले, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २, श्री. विनायक नरळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग, वालीव पोलीस ठाणे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयरात रणवरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सैय्यद जिलानी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटिकरण अधिकारी स.पो.नि. सचिन सानप, पो.ह. मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, सुनिल चव्हाण, बाळु कुटे, पो.शि. विनायक राऊत, अभिजीत गढरी यांनी यशस्वीरित्या केली आहे.
