भाईंदर : दिनांक ०२.११.२०२१ रोजी सोहनलाल गणेशाराम सुतार, वय ४३ वर्षे यांचा इंद्रलोक नाका ते विमल डेअरी लेन येथे रिक्षात बसुन प्रवास करीत असतांना मोबाईल गहाळ झाला याबाबत त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना सदर घटनेची माहिती समजून घेतली असता असे समजले कि , तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणेच इतरही लोकांचे त्याच परिसरात रिक्षात प्रवास करीत असतांना मोबाईल फोन गहाळ झाले असून सदरील प्रकार करणारे दोन संशईत इसम आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मा. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणुन वेळीच कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्याअनुषंगाने नवघर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी इंद्रलोक नाका, विमल डेअरी लेन व इतर ठिकाणावरील ठिकाणांवरुन प्राप्त पुराव्यांच्या आधारे व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरुन यातील गुन्हा करणारे आरोपी हे भिवंडी येथील राहणार असल्याचे माहितीमिळवली त्यानुसार संशयित आरोपी अकिल मोहमंद शफीक शेख वय ३६ वर्षे यास भिवंडी येथुन ताब्यात घेवुन त्याच्याकडून चोरीचे मोबाईल फोन विकत घेणारा सदरुद्दीन जमालुद्दीन अन्सारी, वय ४४ वर्षे अशा दोघांना तपासाअंती अटक करण्यात आली . तपासादरम्यान यातील अटक आरोपी कडून १,७३,०००/- रु. किं. चे वेगवेगळया कंपनीचे १४ मोबाईल फोन व गुन्हा करतांना वापरलेली काळया रंगाची बजाज पल्सर मोटार हस्तगत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरोपींकडून नवघर पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा चोरीस गेलेल्या मोबाईल फोन ची जप्ती करण्यात येवून सदरचा गुन्हा देखील उघडकीस आणण्यात नवघर पोलिसांना यश आले आहे . तसेच नमुद गुन्हयात हस्तगत करण्यात आलेले इतर १२ मोबाईल फोनचे धारक यांचा शोध घेवून त्यांची खबर घेवुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
सदरची कामगिरी श्री. अमीत काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०१, डॉ. शशीकांत भोसले, सहा. पो. आयुक्त, नवघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोनि/प्रकाश मासाळ (गुन्हे), सपोनि/योगेश काळे, पोउनि/संदिप ओहोळ, पोना/भुषण पाटील, पोशि/गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत यांनी केलेली आहे.
