दिनांक १९/१०/२०२१ रोजी ईद-ए-मिलाद जुलूस साजरा करून मिरवणुक काढण्यात येणार असून सदरबाबत महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शनक सुचना जारी केलेल्या आहेत. मिराभाईंदर शहरातील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येदेखील ईद-ए-मिलाद जुलूस साजरा करण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने कोवीड -१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व मिरवणूक शांततेने पार पाडावी व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्ननिर्माण होऊ नये. या अनुषंगाने मिरवणूकीचे मार्गाला जोडणाऱ्या इतर मार्गांना मिरवणूकीच्या वेळी वाहतूक नियमन करण्यासाठी प्रवेश बंद करणे, फेरीवाल्यांना मिरवणूक काळात प्रवेशास मनाई करणे, वाहनांना पार्कीगला मनाई करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, अतिरिक्त कार्यभार- पोलीस उप आयुक्त, (मुख्यालय) मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी वाहतुकीबाबत अधिसुचना जारी केलेली आहे. ईद-ए-मिलाद मिरवणूकीचा मार्ग खालीलप्रमाणे राहील.
नयानगर पोलीस स्टेशन हद्दितील शम्स मशिद समोरुन मिरवणूकीस सूरुवात होऊन -हजरत अशरफ मखदुम सिमनानी चौक-मशिद हजरत इब्राहीम चौक (पूजा नगरचौक)-डावीकडे वळून-अल हयात मेडीकल-कुरेशी हाऊस-हास्य कवी डॉ. श्यामसुंदर चौकात उजवीकडे वळण घेऊन–टिपू सुलतान चौक-उजवीकडे वळून लोढा कॉम्प्लेक्स रोडने-गणेश मंदीर-मुज्जम्मील शेगडी रेस्टॉरंट-बज्जे रजा चौक (निलम पार्क)-मोहम्मद मक्तबुल मदीना मशिद (नमाज पॉईंट मार्गे)बाणेगर हायस्कूल फाटा-नरेंद्र पार्क (टी पॉईंट) डावीकडे वळून-हैदरी चौक-एनएच स्कूल चौक – वॉक्हार्ट हॉस्पिटल चौक-रसाज सर्कल-उजवीकडे वळून-अपोलो फार्मसी मेडीकल-एचडीएफसी बँक -हजरत अल्लामा सय्यद हमीद अशरफचौक-पुन्हा शम्स मशिद समोर पोहचून समारोप होणार आहे.
दिनांक- १९/१०/२०२१ रोजी सकाळी १५.०० वा .ते रात्रौ. १९.०० वा. पर्यंत मिरवणूकीचे मार्गावर फेरीवाले व वाहनांना थांबण्यास मनाई करण्यात आली असून मिरवणूकी दरम्यान नमुद मिरवणूक मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग-नमुद वाहनांनी मिरवणूक मार्गाच्या आजूबाजूच्या सर्व मुख्य रस्ते, उप रस्ते, बोळी यांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावयाचा आहे.
सदरची अधिसूचना ही दि. १९/१०/२०२१ रोजी किंवा दिनांक- २०/१०/२०२१ रोजी (चंद्र दर्शनुसार) ईद निमीत्त निघणाऱ्या मिरवणूकीच्या दिवशी १५.०० वा.ते १९.०० वा. पर्यंत अंमलात असणार आहे.सदरची अधिसूचना ही रुग्णवाहीका, पोलीस प्रशासन, अग्निशमनदल, महानगर पालिकेची वाहने इ. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी अंमलात राहणार आहे.
