इको चारचाकी वाहनांतील सायलेन्सर चोरी करणा-या टोळीस अटक .

Crime News

काशिमिरा :  चारचाकी वाहनांतील सायलेन्सर चोरी होण्याचे प्रकार मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील विशेषत: वसई-विरार परिसरात घडत असल्याने या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून  मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे  एक विशेष पथक नेमण्यात आले होते त्याप्रमाणे सदर पथकाने अहोरात्र मेहनत करुन त्यांना दिनांक २३/०१/२०२२ रोजी गुप्त बातमीदार यांच्या कडुन अशाप्रकारे गुन्हे करणारी टोळी ही हाटकेश चौक, काशिमिरा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पोलीस पथकाने त्याठिकाणी सापळा रचुन १) इम्रान ईरशाद खान वय ३५ वर्षे, २) शाहरुख नसीम खान वय २४ वर्षे, ३) जावेद बशीर खान वय २८ वर्षे सर्व रा. घाटकोपर, मुंबई यांना ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये सायलेन्सरचे पार्ट व ते कटींग करण्याकरिता लागणारे साहीत्य मिळुन आले. त्याअनुषंगाने तपास केला असता . त्याच्याविरुद्ध आचोळे पोलीस ठाण्यात दाखल असलेला  गुन्हा उघडकीस आला.

आरोपींकडे असलेले  इतर सायलेन्सरचे पार्ट व सायलेन्सर कटींग करणेकारीता आवश्यक असलेले साहीत्य मिळुन आले आल्याने हि टोळी या कामात सराईत असल्याची दाट शक्यता वाटल्याने पोलिसांनी त्यांचेकडुन सदर गुन्हयाच्या कार्यप्रणालीप्रमाणे पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्या मध्ये दाखल असलेल्या   गुन्हयाची उकल करण्याकरिता  आरोपीची सखोल चौकशी केली असता त्यांनी या अगोदर  आचोळे, नालासोपारा,  तुळींज , विरार  पोलीस ठाणे असे एकुण ०८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे व नवी मुंबई आयुक्तालयातील खारघर, कोपरखैरणे ,कामोठे,व रबाळे,असे एकुण १० गुन्हे हे अटक आरोपी व फरार  आरोपी सैबान यांनी मिळुन एकुण १८ सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. सदर गुन्हयातील सायलेन्सरचे पार्ट, सायलेन्सर चोरी करण्यासाठी आवश्यक साहीत्य व गुन्हे करण्यासाठी वापरलेली सेंट्रो कार असा एकुण ३,६६,०००/- चा मुददेमाल आरोपीकडून   पोलिसांनी जप्त केला आहे .

सदरची कारवाई ही डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), व श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.नि. राहुल राख्न, सपोनि अमोल आंबवणे, सपोनि/दत्तात्रय सरक, सपोनि/नितीन बेंद्रे, पोउनि/कैलास सोनावणे, सफौ/चंद्रकांत पोशिरकर, पोहवा/१४९३ मते, पोहवा/२७२७ राणे, पोहवा/२७७३ तावरे, पोहवा/यादव, पोना/केंद्रे, पोना/१०३१ काळे, पोना/१६१० पाटील, पोअं/१८६७ वेल्हे, पोअं/३३७५ श्रीवास्तव, पोअं/३५०२ जगताप, पोअं./३५७९ सुशील पवार, पोअं/९५९ गायकवाड यांनी केलेली आहे.

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply