सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे दि २७.०२.२०२१ रोजी चर्निरोड येथे जाण्यासाठी भाईदर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ०६ वरुन सुमारे १४.५४ वाजताची चर्चगेट फास्ट लोकल गाडीच्या मधले जनरल डव्यात दरवाज्याच्या बाजूला उभे राहुन बॅग पाठीला अडकवून प्रवास करीत असताना.
सदरची लोकल चर्नीरोड रेल्वे स्टेशन येथे येण्यापुर्वी सुमारे १५.१४ वाजता त्यांनी त्यांचे पाठीस अडकविलेल्या सँगबॅगमधील एकुण रुपये ३,७३,७१०/- किंमतीचे सोने -चांदीचे दागीने रोख रक्कमेसह कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी यांची सँगबॅग खालून कापून चोरुन नेले असलेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून चर्चगेट रेल्वे पोलीस ठाणे , गु.र.क्र. २४/२०२१, कलम, ३७९ भादवि गुन्हा दाखल केला.
नमुद गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करत होती, तपासादरम्यान यातील फिर्यादी यांनी सांगीतलेली हकिकत आणि तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबींमध्ये तफावत दिसुन येत असल्याने फिर्यादी यांचा सी.डी.आर. मागवुन त्याचे विश्लेषन केले तसेच गुन्हा घडल्या दिवशी फिर्यादी यांनी कोणा कोणाला कॉल केले होते, त्यातील सर्वाकडे कसुन चौकशी केल्यानंतर फिर्यादी यांना विश्वासात घेवुन त्याच्याकडे अधिक, कसुन व सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा हा त्याने त्याच्या मित्रासह केला असल्याची कबुली दिली.
त्यानंतर यातील फिर्यादी नामे अमरसिंह मागुसिंग राजपूत , वय २३ वर्षे , रा.ठी. भाईदर(पुर्व), जि – ठाणे आणि त्याचा मित्र नामे कालूसिंह चुनीसिंह राजपूत, वय २३ वर्षे, रा.ठी. भाईदर पश्चिम, जि.-ठाणे यांना वर नमुद गुन्हयात रितसर अटक करून पोलीस कोठडी रिमांड मुदतीमध्ये गुन्हयातील अपहार केलेली किंमत रु.१,५५,६८०/-किंमतीची वजन अंदाजे २ किलो ७८० गॅम चांदीची लगड (वीट), आणि रोख रक्कम रू २०,०००/-असे एकुण रू.१,७५,६८०/- किंमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
तसेच नमुद गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपीच्या दुकान मालकाने त्यास तक्रार देते वेळेस, त्यांना इंशोरन्स मिळावा या उद्देशाने किंमत वाढवुन तक्रार देण्यास सांगीतल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्हयामधील शंभर टक्के मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो, श्री.कैसर खालीद, पोलीस उप आयुक्त श्री. प्रदीप चव्हाण, गुन्हे शाखेचे वपोनि श्री शैलेंद्रधिवार, पो.नि.शहाजी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन लोखंडे आणि पोलीस अमलदार महेश सुर्वे, अशोक गोसावी, शौकत मुजावर, स्मिता वसावे, लक्ष्मण वलकुंडे, आणि पथकाने केली आहे
