विरार (पूर्व) येथे राहणारे वय-१९ हिरे दलाल हे दिनांक. २२/०१/२०२१ रोजी नेहमीप्रमाणे दैनंदिन व्यवसायासाठी बी.के.सी मुंबई येथे गेले मात्र त्यांना दलाली व्यवसायामध्ये झालेल्या आर्थिक नुकसानांमुळे घरी परत नाही येतात त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आत्महत्या करीत असल्याचा मेसेज पाठवला.
मेसेज वाचताच त्यांच्या नातेवाईकांनी विरार पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग क्र. २७/२०२१ अन्वये दाखल केली. विरार पोलीसांनी सदर प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेऊन तांत्रिक तपास केला. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन पहाटे ५:०० च्या सुमारास नालासोपारा रेल्वे परिसरातून सुखरूप ताब्यात घेऊन त्यांना सामुपदेश करून आत्महत्येपासून परावृत्त करून त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये दिले.
सदरची कामगिरी श्री प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ श्रीमती. रेणुका बागडे , सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे, पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे आणि पथक यांनी केली आहे.
