आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता -मुख्यमंत्री उद्धव ठाकर

Political News

मुंबई- कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही ठाकरे यांनी सांगितले. बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालय व देऊळगाव राजा येथील कोविड हेल्थ सेंटरचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे
च्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रास्ताविकात बुलडाणा येथील स्त्री रूग्णालय व देऊळगाव राजा येथील टाटा ट्रस्टच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर इमारतीची वैशिष्ट्ये सांगितली. तसेच याकामी टाटा समूहाने केलेल्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले.  जिल्ह्यात कोविड चाचणी प्रयोगशाळा उभारणीचे काम सुरू असून तेही लवकरच पूर्णत्वास येईल, अशी माहिती दिली. त्याचबरोबर या आरोग्य सुविधांच्या निर्मितीमुळे कोविड रूग्णालय व कोविड केअर सेंटर येथे अनुक्रमे १०० व २० खाटांची सोय झाल्याचेही स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी द्यावी, अशी मागणीही मांडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई- लोकार्पण करून दोन्ही रूग्णालयात उपलब्ध सुविधांची चित्रफीत दाखविण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समूहाला ठाकरे यांनी धन्यवाद दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. केवळ अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक आहे. त्यासाठीच बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा प्रस्ताव द्यावा. कोविडवरील उपचारांसाठी आवश्यक औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता, प्राणरक्षक औषधे यासारख्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने जिल्हास्तरीय टास्क फोर्स तयार केला आहे. या टास्क फोर्सला असणार्‍या कोणत्याही मार्गदर्शनासाठी ते विनाविलंब मुंबई स्थित टास्क फोर्ससी संपर्क साधून मदत मिळवू शकतात. असेही ठाकरे यांनी सांगितल

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply