भाईंदर : दिनांक २०/१२/२०२१ रोजी आमिर तलहा मुखी या हॉटेल व्यावसायीकास दोन अज्ञात पुरुष व एक महिला यांनी फोन करुन आपण आमदार गीता जैन यांचा पी. ए. अमन शेलार बोलत असुन आमदार गीता जैन आपल्याशी बोलणार आहेत असे सांगुन अज्ञात महिलेने आमदार गीता जैन बोलत असल्याची तोतयेगिरी करुन “हमारे समाज में हम विद्रावा महिलायोके शादी का प्रोग्राम रखा है, तो उसके लिए हमे आपसे डोनेशन चाहीए” असे सांगुन पैशाची मागणी केली .त्यावरून आरोपी यांनी हॉटेल व्यावसायीकाकडे पैसे घेण्यासाठी अमितकुमार बद्राकांतभाई पारेख वय ५४ वर्ष यास पाठवले सदर गोष्टीचा हॉटेल व्यावसायीक आमिर तलहा मुखी यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यांच्या अनुषंगाने अमितकुमार पारेख यास पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता त्याने आपला सहकारी (२) सिध्देश सुधाकर सावंत ऊर्फ अमन शेलार, वय ४२ वर्ष, व एक महिला यांचा या गुन्हयांत सहभाग असल्याचे कबूल केले त्यावरून काशिमीरा पोलिसांनी आरोपीस या गुन्हयात अटक केली असून सदर आरोपीना मा. न्यायालयाकडुन दिनांक २४/१२/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, श्री. विलास सानप सहा. पोलीस आयुक्त मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि/संजय हजारे काशिमीरा पोस्टे, सपोनि/ महेंद्र भामरे, सपोनि/योगेश देशमुख, सपोनि/टिकाराम थाटकर व त्यांचे पथकाने केली आहे.
