वर्सोवा खाडीत उडी घेतलेल्या महिलेला खाडी बाहेर काढून वाचविले प्राण.
वर्सोवा येथे दुपारच्या वेळेस वर्सोवा खाडीमध्ये वसई येथे राहणाऱ्या महिलेने आत्महत्या करण्याकरिता पुला खाली उडी मारली.
तेव्हा मिरारोड परिमंडळ वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई/३२३२ नरेश चौधरी यांनी प्रसंगावधान राहून तात्काळ वर्सोवा पुलाखाली धाव घेऊन तेथे हजर कामगारांच्या मदतीने सदर महिलेस खाडीतून बाहेर काढले.
तात्काळ ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून उपचार मिळवून देण्यात आला आणि सदर महिलेचा जीव वाचविला.
