आज राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त ई-मतदान ओळखपत्राची e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अँपच्या माध्यमातून वाटप सुरु करण्यात आले आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाले आहेत.
हे डिजिटल कार्ड मतदार निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वरून मतदारकार्ड पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकतात.
पहिल्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारी दरम्यान नवीन मतदारांना डिजिटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे नवीन मतदार नोंदणी करतील त्यांना डिजिटल वोटर कार्ड मिळेल.
येत्या काही महिन्यामध्ये देशातील ५ राज्यामध्ये निवडणुक लागणार आहे. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पॉडिचेरीमध्ये विभागसभा निवडणूक होणार आहेत, प्रत्येक नागरिकाला डिजिटल वोटर आयडी मिळू शकेल का हे पाहावे लागणार आहे.
ई-मतदार ओळखपत्रासाठी सर्व प्रथम https://voterportal.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेत स्थळाला भेट द्या.
यानंतर तुम्हाला लॉग इन करावे लागेल जर तुमचे अकाउंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकॉउंट सुरु करू शकता.
वेबसाईटवर लॉग इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा
