विरार पच्छिम येथील एस. टी. स्टँड आवारातील नवनाथ रसवंती गृह या ठिकाणी आरोपी महिला वय – ३७ वर्षे व वय – ४० या दोघी राहायला नारंगी गाव यांनी आठ महिन्यांच्या अल्पवयीन मुलीला त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी एका महिलेला वय – ५० वर्षे राहायला नालासोपारा व पिपला बिपिन उर्फ डॉक्टर जितेन वय – ४६ वर्षे राहायला निळमोरे गाव नालासोपारा यांच्यामार्फत विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याला मिळाली.
माहिती मिळताच विरार पोस्ट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे पोलीस निरीक्षक श्री विवेक सोनावणे पोलीस उपनिरीक्षक श्री टेलर व पोलीस स्टाफ यांनी छापा टाकून आठ महिन्याच्या अल्पवयीन मुलीची सुटका करून वेश्या व्यवसायासाठी विक्री करणारे दलाल ०४ आरोपी यांच्याविरुद्ध विरार पोलीस ठाणे गु.रजि.नं १३६/२०२१ भाऊ.द.वि.स. कलम ३७० (१) ३४ सह बाल न्याय अधिनियम सन २०१५ कलम ७९,८१ प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपींना सदर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई श्री प्रशांत वांगुळे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्रीमती रेणुका बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश वराडे /श्री. विवेक सोनावणे आणि पथक यांनी केली आहे.
