कौटुंबिक हिंसाचार या संवेदनशील विषयावर आजही बोलले जात नाही समाज काय म्हणेल या गोष्टीमुळे बहुतांशजण त्रास सहन करतात.
हिंसाचार करणारी व्यक्ती ही अट्टल गुन्हेगार असते किंवा तिच्यावर होणारा हिंसाचार छळ कुठे चौकात वा बाजारात नाही तर तिच्या स्वतःच्या घरात जवळच्या व्यक्तीकडून होत असतो.
बऱ्याचदा स्त्रिया माघार घेतात पण कोणतीही गोष्ट सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यावर त्या माघार घेत नाही.
तर अशीच काहीशी घटना बोरिवली मध्ये राहणाऱ्या सौ.कोमल गिरीराज भटजोशी यांच्यासोबत झाली. वयाच्या २२व्या वर्षी लग्न झालेली सौ. कोमल भटजोशी ठाणे परिसरात राहत होती.
सौ.कोमल भटजोशी हीच लग्न तिच्या माहेरच्या शेजारी राहणारे नातेवाईक यांच्या ओळखीने जमले होते, त्यांचं लग्न राहत्या गावी गुलबर्गा कर्नाटक राज्य येथे दोन्ही घराच्या संमतीने झाले होते.
लग्नानंतरचे सुमारे पंधरा दिवस कोमलच्या सासर मंडळांनी तिला चांगली वागणूक दिली परंतु त्यानंतर लहान सहान कारणांवरून सासू आणि नणंद तिच्या मागे कटकट आणि शिवीगाळी तसेच वेळप्रसंगी विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.
सौ कोमल हिच्या सासऱ्यांना दारू पिण्याचे व्यसन असल्याकारणाने त्यांनी अनेकदा कोमलकडे शरीरसुखाची मागणी करुन शरीराला बळजबरीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तसेच एकांत झाडून तिचे चुंबन घेऊन स्वतःच्या अंगातील लुंगी वर करून गुप्तांग दाखवून कोमलच्या विनयाचा अपमान करून तिचा विनयभंग करण्यात आला आणि जर त्यावर पण तिने त्यांना नकार दिला तर जबरदस्ती तिच्या अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न देखील केला.
ह्या सर्व गोष्टी कोमलने तिच्या पतीला सांगण्याचा खूप प्रयत्न केला.परंतु तिचं काहीही न ऐकता तिच्या पतीने सासु-सासऱ्यांच्या आणि नणंदेच्या कृत्यांना साथ दिली.त्यामुळे कोमल एकाकी पडली होती.
रात्रीचा वेळ साधून सुमारे एक च्या दरम्यान कोमलच्या सासूने आणि नणंद ने पुन्हा शुल्लक कारणावरून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि त्यावेळी कोमलच्या नणंदने ‘अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकेन’ असे धमकावले त्यावेळी तिच्या सासऱ्यांनी हातात लाकडी काठी घेऊन तिला मारहाण करण्यास सुरवात केली आणि तिच्या अंगावर रॉकेल टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कोमल बाथरूममध्ये पळाली आणि आतून कडी लावून घेतली थोड्या वेळा नंतर तिने बाहेर येण्याचा प्रयत्न करताच तिच्या सासऱ्यांने तिचे डोक्यावरचे केस ओढण्यास सुरुवात केली तसेच अंगावरील कपडे ओढण्यास देखील सुरुवात केली त्यामुळे कोमलची अवस्था अर्धनग्न झाली होती, त्यावेळी तिचे पती गिरीश भटजोशी यांनी दरवाजावरील बेल वाजल्याने ती धावत जाऊन दरवाजा उघडला असताच त्यांनी काय झाले हे विचारले तर त्यावर कोमलच्या सासूने खोटेपणाचा आव आणून ‘ही नणंदेला शिवीगाळीकरते असं तिच्या पतीला सांगितले’ त्यानंतर कोमलच्या पतीने देखील तिला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला आणखीन मारावे असे सासरे सांगू लागले, मारहाण करताना कोमलच्या सासऱ्यांनी तिच्या हातावर थुंकून ती थुंकी तिला चाटण्यास सांगितले त्या किळसवाण्या प्रकाराला कोमलने विरोध केला असता तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
शेजाऱ्यांना ऐकू जाऊ नये म्हणून कोमलच्या सासरचे रात्री अकराच्या दरम्यान तिला त्रास देण्यास सुरुवात करत असे.कोमलचा मोबाईल फोन काढून घेतल्या कारणाने तिला तिच्या माहेरच्या मंडळींना तिची अवस्था व तिच्यावर होणार अन्याय कधीच सांगता आला नाही.
एक दिवशी आई सोबत फोनवर बोलताना कोमल च्या आईला संशय आला. परंतु फोन वरील संभाषणाचे रेकॉर्डिंग चालू असल्याकारणाने कोमल ला तिच्या आईशी जास्त वेळ बोलता आले नाही तेव्हाही ते रेकॉर्डिंग केलेले संभाषण ऐकून तिच्या घरातल्यांनी तिच्यावर मारहाण केली.सासरच्या लोकांकडून होणारे शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून कोमलने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचार देखील केला. परंतु तिने स्वतःला समजावून इथून बाहेर निघून चांगला मार्ग निवडण्याचं निश्चित केले आणि सायंकाळच्या वेळेला घरातली सर्व मंडळी झोपलेली असताना ती घराबाहेर पडली माहेरचा रस्ता माहित नसल्याकारणाने कोमल पूर्ण पणे डगमगून गेली होती. परंतु एका रिक्षावाल्याने तिची अवस्था पाहून तिची चौकशी केली आणि तिच्या भावाचा फोन नंबर घेऊन त्याला तातडीने बोलावून तिला सध्या राहत्या घरी घेऊन जाण्यात आले
त्यानंतर दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी सौ.कोमल भटजोशी यांनी बोरिवली पोलीस ठाणे येथे सासरी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तक्रार दाखल केली.
आणि या सर्व गांभीर्याची दखल बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई यांनी घेतली आहे
