काशिमीरा : अमृत उदयकुमार तानावडे, वय. २५ वर्ष, याने दिनांक २०/१२/२०२१ रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यात येवुन कळविले की, दि. १९/१२/२०२१ रोजी रात्रौ १२.३० वाजताचे सुमारास ठाणे येथून कामावरुन पायी परत येत असतांना अहमदाबाद मुबंई हायवे रोडवर घोडबंदर खिंड येथे अंधारात रस्त्यावर त्याला तीन अनोळखी इसमांनी चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम व दोन मोबाईल जबरदस्तीने चोरी करून पळून गेले. त्याने दिलेल्या या तक्रारीनंतर काशीमीरा पोलीस ठाणे येथे २०/१२/२०२१ रोजी तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा प्रकार हा गंभीर स्वरुपाचा वाटल्याने हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिल्या . त्याप्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार हे करीत असतांना तक्रारदार यांचे जबरी चोरीस गेलेल्या ०२ मोबाईल चे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास केला असता त्याचा रेड मी कंपनीचा मोबाईल फोन हा जुन २०२१ पासून त्रयस्थ व्यक्ति वापरत असल्याची खात्रीलायक माहीती समोर आली. सदर गुन्हयातील तक्रारदार हे काहीतरी माहिती लपवत असल्याचा संशय आल्याने अमृत तानावडे यांना विश्वासात घेवून त्याची झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांचा रेड मी कंपनीचा मोबाईल फोन हा गेल्या ०७ ते ०८ महिन्यापूर्वी मिरारोड ते चर्नीरोड या रेल्वेप्रवासात गहाळ झाला होता तर त्यांचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन हा घोडबंदर रोड, ठाणे येथील कामाच्या ठिकाणी कोठेतरी गहाळ झाला असल्याची माहीती त्याने दिली दिली. त्याने हा चोरीचा खोटा गुन्हा पोलीस ठाण्यात का दाखल केला? हे विचारले असता त्याच्याकडून गेल्या ०७ ते ०८ महिन्यात वैयक्तिक हलगर्जीपणामुळे ०२ महागडे अँड्रॉईड मोबाईल फोन गहाळ झाले होते. त्यामुळे त्याच्या आई वडिलांना तो मोबाईल विकत असेल असा संशय येत होता , याकारणास्तव आपल्या आईवडिलांची जाणीवपूर्वक दिशाभुल करण्यासाठी काशीमीरा पोलीस ठाणे येथे दि. २०/१२/२०२१ रोजी त्याने हा चोरी झाल्या बाबत खोटा बनाव करून गुन्हा नोंद केला आहे असे गुन्हयाचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी श्री. अमित काळे, पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०१, श्री विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.निरी. श्री. संजय हजारे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि/महेंद्र भामरे व सहकारी अंमलदार नेम. काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.
