नालासोपाला: दिनांक २९/०१/२०१९ रोजी नरेंद्र रामचंद्र पवार वय ५३ व पत्नी नम्रता नरेंद्र पवार वय ५० वर्षे त्यांचा मुलगा जन्मेश नरेंद्र पवार रा. सी/२०२, इम्पेरियल टॉवर, पाटणकर पार्क, नालासोपारा पश्चिम या ठिकाणी राहत होते .वडिलांचा व मुलाचा मार्केटिंगच्या पैशाच्या व्यवहारावरून वाद होता तो राग मनात ठेऊन जन्मेश पवार याने नरेंद्र रामचंद्र पवार व आई नम्रता नरेंद्र पवार हे घरात झोपलेले असतांना त्यांना लोखंडी हातोडीने डोक्यात गंभीर वार केले तसेच चाकुने व स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्यांना गंभीर दुखापती केल्या होत्या. त्यामध्ये नम्रता नरेंद्र पवार ह्यांचा मुर्त्यू झाला व नरेद्र पवार हे गंभीर जखमी झाले होते. जन्मेश पवार हा गुन्हा करून फरार झालेला होता त्याच्याविरुद्ध नालासोपारा पोलीस ठाण्यात नरेंद्र पवार यांनी तक्रार नोंदविली होती त्यानुसार आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार नालासोपारा पोलीसांना यातील आरोपीचा वेगवेगळया मार्गाने माहिती काढून आरोपीचा शोध घेत असतांना नालासोपारा पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील आरोपी जन्मेश पवार हा कोलकत्ता राज्य पश्चिम बंगाल येथे असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने व वरिष्ठांचे परवानगीने नालासोपारा पोलीस स्टेशनचे सपोनि. श्री. अमोल तळेकर, पोना आदिनाथ कदम, पोना. सचिन कांबळे यांना कोलकत्ता, राज्य पश्चिम बंगाल येथे पाठविण्यात आले होते. सदरील तपास पथकाने कोलकत्ता येथे जावून स्थानिक पोलीसांचे मदतीने यातील आरोपीचा कसोशिने शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. सदर आरोपी जन्मेश नरेद्र पवार यास वरील गुन्हयामध्ये अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढिल तपास सपोनि. श्री. किशोर माने हे करित आहे.
सदरची कारवाई श्री प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-३, श्री चंद्रकांत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास सुपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहूल सोनावणे, पोलीस निरीक्षक, सपोनि. श्री. अमोल तळेकर, पोना आदिनाथ कदम, पोना. सचिन कांबळे यांनी केली आहे.
