आंतरराज्यीय घरफोडी ,चोरी करणारी टोळीस काशिमीरा पोलिसानी केली दिल्लीतून अटक- लाखोरुपयांचा माल जप्त .

Crime News Cyber Crime Latest News Political News ताज्या घडामोडी

काशिमिरा :  घरफोडी चोरी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील सराईत आरोपींना  अटक करुन एकुण ८,६८,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार न्यु श्री. गणेशकृपा सोसायटी,रुम नं १४,  अमर पॅलेस जवळ, काशिमीरा, मिरारोड पुर्व येथे राहणारे प्रविण दिगंबर शेटये हे दिनांक ०५/११/२०२२ रोजी  दुपारच्या दरम्यान मुलाच्या लग्नाचा हॉल बघण्यासाठी गेले असताना त्या वेळेचा फायदा उचलून अज्ञात चोरटयांनी  घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलुप व मुख्य दरवाजाचे लॅच तोडून घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील एकुण ७,३५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व २,००,०००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ९,३५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल  घरफोडी  करुन नेला. सदरबाबत काशीमीरा पोलीस ठाणे येथे  प्रविण दिगंबर शेटये यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होतो.

काशिमीरा पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी सपोनि/प्रशांत गांगुर्डे व त्यांचे पथकास सदर गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे पोलीस  पथकाने नमुद गुन्हयांचे घटनास्थळाची पाहणी करुन प्राथमिक पुरावे हस्तगत करून  आरोपी हे गुन्हा करण्यासाठी गाझीयाबद व दिल्ली या ठिकाणाहुन येवुन गुन्हा केला असल्याचे समजून आले. त्या अनुशंगाने पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ यांनी दिलेल्या परवानगीने काशिमिरा पोलीस ठाण्याचे पथक गाजियाबाद याठिकाणी जावुन आरोपी हबीब हाफिज सैफी वय ४५ वर्षे, रा. – बेहटा हाजिपुर, गाझीयाबाद, रा. उत्तर प्रदेश हा राहत असलेल्या परिसरात सलग ०२ दिवस वेशभुषा बदलुन सापळा रचुन दि. १२/११/२०२२ रोजी बेहटा, हाजिपुर, जिल्हा गाझीयाबाद, राज्य उत्तरप्रदेश येथुन ताब्यात घेवुन त्याला नमुद गुन्हयात अटक केली तसेच पोलीस कोठडी दरम्यान आरोपीने  सदर गुन्हा हा त्याचे साथीदार आरोपी १) रमेश ऊर्फ कालु बैसाखीराम राजपुत व २) अकबर सुलतान सैफी दोन्ही रा. नवी दिल्ली यांचे सोबत मिळुन केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आरोपी रमेश ऊर्फ कालु बैसाखीराम राजपुत यास शाहदरा, नवी दिल्ली परिसरात पोलिसांनी सलग ०४ दिवस सापळा रचुन दिनांक १९/११/२०२२ रोजी अटक ताब्यात घेतले तसेच गुन्हयातील चोरुन नेलेला मुद्देमाल आरोपी रमेश राजपुत यांने त्याच्या परिचयाचा इसम दादासाहेब ऊर्फ पिंटू रामचंद्र मोहिते यांच्याकडे वितळविण्यासाठी दिले  असल्याचे सांगितल्याने २२० ग्रॅम. (२२ तोळे) वजानाची सोन्याची लगड त्याच्याकडुन पंचनाम्यान्वये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले  आहे.

वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या ९,३५,००० /- रुपयाच्या मुद्देमालापैकी आरोपींकडून  तपासादरम्यान २२० ग्रॅम. (२२ तोळे) वजानाचे एकुण ७,३५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने व १,३३,५००/- रुपये रोख रक्कम असा एकुण ८,६८,५००/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी  हस्तगत केला आहे हा गुन्हा  करतेवेळी आरोपी यांनी  कोणताही पुरावा मागे न ठेवता देखील गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्ह्याच्या घटनास्थळावरून मिळुन आलेल्या तांत्रिक बाबींचे विष्लेशन करुन तसेच सलग १३ दिवस दिल्ली व उत्तरप्रदेश येथे वेशभुषा बदलून सापळा रचुन आरोपीना अथक प्रयत्नान्वये अटक करुन गुन्हयातील मालमत्ता हस्तगत केली आहे.

सदर कामगिरी श्री जयंत बजबळे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०१, श्री विलास सानप, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली काशिमिरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय हजारे, पोनि श्री विजय पवार (गुन्हे), स.पो.निरी / श्री प्रशांत गांगुर्डे, पोउनि निखिल चव्हाण, पो. उपनिरीक्षक (श्रेणी) श्री प्रकाश कावरे, पो. हवा. ०६०३४ सचिन हुले, पो.हवा./०७१४१ हणुमंत तेरवे, पो.हवा./०७१३६ परेश पाटील, पो.हवा./०७१३९ निलेश शिंदे, पो.हवा./१००४९ सुधीर खोत, पो.हवा./१००५३ राहुल सोनकांबळे, पो. अंम / १२१०० रविंद्र कांबळे व पोहवा./०००२० जयप्रकाश जाधव (पो.उ.आ. कार्यालय, परीमंडळ १) सर्व नेमणुक काशिमीरा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

 

Police Batmi

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 5 / 5. Vote count: 1

No votes so far! Be the first to rate this post.

Leave a Reply