पोलीस आयुक्त, व अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांनी वेळोवेळी आयुक्तालयातील अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत.
त्यानुसार पोलीस उपायुक्त, गुन्हे श्री. महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. राम देशमुख यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी काशीमिरा, मिरारोड, नयानगर या पोलीस ठाणे हद्दीतील विनापरवाना, बेकायदेशीर रित्या अवैध लॉटरीचे नावाखाली जुगार अडडे चालवून शासनाची फसवणूक करणा-या ६ जुगार अडडयांवर छापा टाकून एकुण १९ इसमांना ताब्यात घेतले आहे.
त्यांचेकडून एकुण १,३०,६८५/- रूचे लॉटरीचे साहीत्य व रोख रक्कम असा मुदेदमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत संबधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्याची प्रक्रीया चालू आहे.
सदरची कारवाई ही गुन्हे शाखेचे पोनि जितेंद्र वनकोटी, पोनि भास्कर पुकळे, पोनि संपत पाटील, पोनि प्रमोद बडाख, पोनि अविराज कुराडे, पोनि शाहुराज रणवरे व ४० पोलीस अंमलदार यांनी मिळून केली आहे.
