मुबंई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात रेल्वे मेल एक्सप्रेस गाड्यामधुन अवैध दारूची वाहतूक व विक्री करणारे गुन्हेगारांवर कार्यवाही मा. पोलीस आयुक्त सो . लोहमार्ग मुंबई यांचे आदेश आले होते. त्या नुसार
दिनांक ०३/०८/२०२१ रोजी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा येथील इंग्लिश दारू विकत घेऊन ती राज्य गुजरात येथे विकण्यासाठी घेवून जाणारे ०३ इसम त्रिवेंद्रम वेरावलं एक्सप्रेस या गाडीतून अहमदाबादच्या दिशने जात आहेत. लागलीच सदर गाडीच्या रूटचा अभ्यास करून सदरची गाडी हि गोवा येथून पनवेल मार्ग वसई व अहमदाबाद येथे जाते त्यानुसार सदरची गाडी पनवेल रेल्वे स्टेशन येथे पकडून ती गाडी पनवेल ते वसई रोड रेल्वे स्टेशन दरम्यान चेक केली असता नाव : १) भावेश पटेल वय : ४३ रा. अहमदाबाद , गुजरात २)संजय वंजारा वय :२७ रा. अहमदाबाद , गुजरात ३) मनीष सोनावणे वय : २४ रा. अहमदाबाद , गुजरात यांच्या कडून २,८६,५७६/- एकूण रुपये किंमतीचा मुद्देमाल असा एकूण ०६ बॅग भरलेला माल पंचनाम्या अंतर्गत जप्त करण्यात आला.
आरोपी कडून जप्त करण्यात आलेल्या दारूबाबत तपास केला असता त्यांनी सदरची दारू हि गोवा राज्यातून खरेदी करून, गुजरात राज्यात ठिकठिकाणी विकत असल्याचे कबूल केले.
सदरची कामगीरी हि मा. श्री. कैसर खालिद , मा. पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई, श्री. प्रदीप चव्हाण , पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ, लोहमार्ग मुंबई , याचे आदेशाप्रमाणे श्री. गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हेशाखा , लोहमार्ग मुंबई, मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे , पोहवा , महेश सुर्वे,पोहवा. शौकत मुजावर , पोना . हितेश नाईक , पोना. राकेश भामरे , पोना . लक्ष्मण वळकुंडे , पोना.भैय्ये, पोहवा . सुरेश येल्ला , पोना . सतीश धायगुडे , पोना. महेश काळे, पोना. मयूर सांळुखे , पोना प्रशांत साळुंखे , पोना सत्यजीत कांबळे यांनी केली आहे.
