अर्नाळा : दिनांक २४/०५/२०२२ रोजी अर्नाळा किल्ला गावात अवैधरित्या गावठी हातभटी दारु बनविणे व विक्री करणा-याबाबत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली होती.सदर माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी श्री चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त व अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजु माने यांचेसह पोलीस ठाण्याच्या पथकाने वेगवेळ्या टीम तयार करुन म्हारंबळपाडा जेटी येथुन खाजगी बोटीने सकाळी ०६.०० वाजता रवाना होवुन अर्नाळा किल्ला गावात एकुण ६ ठिकाणी छापे टाकले. छापे टाकले त्या ठिकाणी एकुण १,५९,०००/- रुपये किंमतीचा ४३०० लिटर गावठी हातभटटी दारु बनवण्याकरीता उपयोगात येणारे गुळ मिश्रीत वॉश, (रसायन) व ९८,०००/- रुपये किंमतीची एकुण १०६५ लिटर गावठी हातभट्टीची ३५ लिटरच्या वेगवेगळया ड्रममध्ये भरलेली गावठी दारु असा एकुण २,५७,०००/- रुपये किंमतीचा प्रोव्हिशन गुन्हयाचा माल मिळुन आला सदर माल बाळगणारे एकुण ६ इसमाविरुध्द अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदा नुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्लॅस्टिक ड्रम व गुळ मिश्रीत रसायन वॉश हे पोलीस ठाण्यात घेवुन येणे शक्य नसल्याने ते जागीच नाश करण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री. प्रशांत वांघुडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ विरार यांचे मार्गदर्शनाखाली, श्री चंद्रकांत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त, अर्नाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजु माने, पोनि/ पाटील, सपोनि/ परदेशी, सपोनि/मुसळे, पोउपनि/ उबाळे, पोहवा/डामरे, पवार, सपकाळे, पो.शि/ कैलास पाटील, मोराळे, सिद, आळंगे, कदम मपोशि/ शिळकंदे व होमगार्ड यांनी केली आहे.
