मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयील मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुर्या हेरीटेज, मिरारोड (पु) या ठिकाणी संशयीत नायजेरीयन नागरिक हे अवैधरित्या वास्तव्य करीत असल्याचे तसेच ते ऑनलाईन फसवणुक करीत असल्याबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी सायबर शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी जावुन खात्री केली असता तेथे १) मोसेस व्हिक्टर २) अबोह डिक्सन ओडु ३) इशोला काजीम लावल तिघे (नायजेरीया) सध्या रा. सदर ठिकाणी संशयीतरीत्या मिळुन आले.त्यांच्याकडे भारतात वास्तव्याबाबतची कागदपत्रे पोलिसांनी मागीतली असता त्यांच्याकडे कालबाहय पारपत्र (व्हीसा ) मिळुन आला तसेच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे ०९ मोबाईल हॅन्डसेट, २ लॅपटॉप, २ डोंगल, फेडरल बँकेचे कार्ड, २ कालबाहय अतंराष्ट्रीय पारपत्र (व्हीसा) अशा वस्तु मिळून आल्याने त्यांच्या विरूध्द मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच सदर इसमांविरुध्द हिमाचल प्रदेश येथे फसवुणूकीचा गुन्हा दाखल असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आहे.
सायबर गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालय यांचेकडुन जनतेला आवाहन करण्यात येते की, अवैधरित्या वास्तव्य करणारे नायजेरीयन तसेच ऑनलाईन फसवुणूक झालेली असल्यास नजीकच्या पोलीस ठाणेस अथवा सायबर गुन्हे शाखा, मिरा-भाईंदर,वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा.
मिरा रोड पोलीस ठाणे संपर्क क्र:- ९८२१५५३११७ । सायबर गुन्हे शाखा संपर्क क्रमांक :- ०२२- २८११०१३५ पोलीस निरीक्षक श्री. पोनि/विजय चव्हाण मोबा.- सायबर गुन्हे शाखा व्हॉट्सऍप हेल्पलाईन क्रमांक :९८२१५५३११७, ९००४८८०१३५ई-मेल आयडी 😐 pi.miraroad.mb-vv@mahapolice.gov.in cybercrime.mb-vv@mahapolice.gov.in
सदरची कामगिरी डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. सुजितकुमार गुंजकर, पोउपनिरी संतोष भिसे, पोउपनिरी/ प्रसाद शेनोळकर, पोअं/ गणेश इलग, मपोशि माधुरी धिंडे, मपोशि/सुवर्णा माळी, मपोशि/पल्लवी निकम यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
