पालघर येथे आरोपी नामे नरेंद्र ज्ञानेश्वर मोर (वय४५) राहायला वडराई नारळीबाव ता.जि. पालघर याने एकूण १३,१३० रुपये किमतीचा प्रोव्हिबिशन गुन्ह्याचा माल स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करत असल्याचे सातपाटी पोलीसांना मिळून आले. यावरून सातपाटी पोलिसांनी वडराई येथे छापा टाकला. सदरची घटना दिनांक. १०/०१/२०२१ रोजी ७:०० वाजताच्या सुमारास घडली.
आरोपीच्या ताब्यातून तब्बल १) ६३००/- रुपये किंमतीचे ३५ लिटर क्षमतेचे तीन प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये एकूण १०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू २) ४२००/- रुपये किमतीचे २० लिटर क्षमतेचे चार प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये एकूण ७० लिटर गावठी हातभट्टीची दारू ३) १२००/- रुपये किमतीचे १० लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिकचे ड्रम त्यामध्ये एकूण २० लिटर गावठी हातभट्टीची दारू ४) ३६०/- रुपये किमतीचे ०२ लिटर क्षमतेच्या तीन प्लास्टिक बाटली त्यामध्ये एकूण ०६ गावठी हातभट्टीची दारू ५) ७०/- रुपये किमतीचे ०७ काचेचे ग्लास दारुचा उग्र वास येत असलेले. असे एकूण १२,१३०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपीच्या विरोधात सातपाटी पोलीस ठाणे गुन्हा गु.रजि.क्र. ०३/२०२१ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे, दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर, प्रभारी अधिकारी सातपाटी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
