वरिष्ठांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडा पोलीस ठाणे हद्दीत वाडा
मार्केट मधे, रोठे काँम्पलेक्स इमारतीमधे, द्रोन हॉस्पीटलच्या खाली किराणा मालाच्या दुकानातमध्ये येथे इसम वय-३५ वर्षे, रा.ता.वाडा,
जि.पालघर, याने त्यांच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये काळया गुळाची पावडर, पीवळया काळसर गुळाचे तुकडे केलेला गुळ व नवसागर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल विनापरवाना बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगला असतांना वाडा पोलीस ठाणे यांना मिळून आला.
आरोपीत यांचे ताब्यातुन एकुण ३१,०४०/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यावरून सदर आरोपी यांचेविरुद्ध वाडा पोलीस ठाणे गुन्हा गु.रजि.क्र.४५/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम
६५(फ) प्रमाणे, दाखल केला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई पोनि सुधिर संख्खे, प्रभारी अधिकारी वाडा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.
