मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरील गुजरातकडून ठाणे, नवी मुंबई मार्गे जे.एन.पी.टी. कडे जाणारी अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे ठाणे शहरात मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन सर्व सामान्य जनतेची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. याकरीता मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरून गुजरातकडून मुंबई तसेच ठाणे मार्गे नवी मुंबई व जे.एन.पी.टी. कडे जाणारी अवजड मालाची वाहतूक करणा-या वाहनांच्या वाहतूकीकरिता जिल्हा दंडाधिकारी पालघर यांनी अधिसुचना जारी केलेली आहे.
त्यामुळे मिराभाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात अवजड वाहनांची वाहतूक आजूबाजूच्या शहरांच्या अधिसूचनेमधील वेळेशी मिळतीजुळती ठेवने आवश्यक झाल्याने अवजड वाहनांच्या वाहतूकीच्या वेळा सुनिश्चित करून अवजड वाहनांची वाहतूक व्यवस्था सूरळीत ठेवण्यासाठी श्री अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, मिरारोड, अतिरिक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मिरा-भाईंदर, वसईविरार यांनी वाहतूक अधिसूचना जारी केलेली असून अवजड वाहनांच्या वाहतूकीबाबत सुचना पुढिलप्रमाणे असणार आहे. वाहतूकीकरीता सुरू व बंद करण्यात येणारा मार्ग व कालावधीमुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वरुन गुजरात कडून मुंबई व ठाणे मार्गे नवी मुंबई, जेएनपीटीकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक रात्री २२.०० वा. पासून पहाटे ०४.०० वा. पर्यंत व दुपारी ११.०० वा. ते १५.०० वा. पर्यंत सुरू राहील.तसेच सकाळी ०४.०० वा. ते ११.०० वा. पर्यंत व सायंकाळी १५.०० वा. ते २२.०० वा. पर्यंत अवजड वाहनांना पालघर बाजूकडून ठाणे / मुंबई बाजूकडे जाण्यास मनाई करण्यात येत आहे.
