वालीव : राष्ट्रीय हायवेलगत सुटकेसमध्ये मिळुन आलेल्या पुरुषाचा मृतदेहाची ओळख पटवुन वालीव पोलिसांनी ०५ आरोपींना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वालीव पोलीस ठाण्यात दिनांक १६/०४/२०२२ रोजी तक्रारदार दिपक अमरजी बलई यांनी खबर दिली की, त्यांचे वडील अमरजी गममीरा बलाई हे दिनांक १२/०४/२०२२ रोजी रात्री ०८:०० वा. पासुन बेपत्ता झाले आहेत. त्यावरुन वालीव पोलीस ठाणे येथे मनुष्य मिसिंग नोंद करण्यात आली होती.
सदर मनुष्य मिसिंगमध्ये तपास चालु असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अमोल राठोड व त्याचे साथीदार यांनी अज्ञात कारणावरुन इसम अमरजीत बलई यांचा खुन करुन पुरावा नष्ट होण्याचे दृष्टीने मृतदेह मुंबई-गुजरात राष्ट्रीय हायवे लगत वासमाया ब्रिज जवळील झुडुपात सुटकेसमध्ये भरुन फेकुन दिला आहे.सदर बातमीची खात्री करण्यासाठी त्याठिकाणी जावून पोलिसांनी पहिले असता त्याठिकाणी मृतदेह मिळुन आल्याने मनुष्य मिसिंग तपासी अंमलदार पोहवा/महेश बोडके यांनी खबर दिल्यावरुन वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दिनांक २६/०४/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वालीव पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखा व मध्यवर्ती गुन्हे कक्ष मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय असे दोन समांतर तपास पथके तयार करण्यात आली. गुन्हयाचे तपासात माहिती मिळून आली की, आरोपी दिनेश कन्हैलाल चोबीसा व मयत या दोघांमधे कामण-भिवंडी रोडवर सागर हॉटेल समोर असलेल्या चहाच्या दुकानाचे व्यवहारातुन दोघांमध्ये गेले ०६ महिन्यांपासून वाद होत होते. याच गोष्टीचा आरोपीने मनात राग धरुन त्याचा साथीदार अमरजी गममीरा बलाई (मयत) यांचा खून करण्याचे ठरविले होते. त्यादृष्ठिने आरोपी १) दिनेश कन्हैलाल चोबीसा याने आरोपी २)विशाल भिमु आडे याचे सोबत गुन्हयाचा कट रचुन आरोपी ३) कपिल चंदु राठोड ४) अमोल चंदु राठोड व ५) लक्ष्मण नान्नु पवार यांना चहा हॉटेल मालक अमरजी गममीरा बलाई (मयत) यास जिवे ठार मारण्याची सुपारी दिल्यावरुन दिनांक १२/०४/२०२२ रोजी अमरजी बलाई यांचा खुन करुन मृतदेह नष्ट करण्याच्या हेतुने राष्ट्रीय हायवे लगत झुडुपात बॅगेत भरुन फेकुन देण्यात आला अशी प्रथम दर्शनी माहीती समोर आली आहे.
गुन्हयातील आरोपी कपिल चंद राठोड, अमोल चंद राठोड व लक्ष्मण पवार यांना पोलीसांनी कलबुर्ग (कर्नाटक) येथुन ताब्यात घेतले असुन आरोपी दिनेश यास कामण येथुन तर आरोपी विशाल आडे यास भिवंडी येथुन ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असुन गुन्हा दाखल झाल्यापासुन अवघ्या २४ तासात गन्हयाची उकल करुन सर्व आरोपींना दिनांक २८/०४/२०२२ रोजी अटक करण्यात आली आहे.
वरील कामगिरी श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – २ वसई, श्री. अमोल माडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गन्हे). श्री. पंकज शिरसाट. सहाय्यक पोलीस आयुक्त, तुळींज विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक श्री. राहुल राख नेम-मध्यवर्ती गुन्हे कक्ष, वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे सपोनि/ज्ञानेश फडतरे, पोउनिरी/राजेंद्र साबळे, गुन्हे शाखेचे पोउपनी बेंद्रे व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
