भाईंदर : लहान वयात मुले हि खेळण्यात ,मस्तीत गुंतलेले असतात या बाल वयात त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळाले कि त्या गोष्टीचे ते सोन करतात याचच उदाहरण म्हणजे भाईंदर येथील ०६ वर्षाचा मुलगा कु. समर्थ वैभव तांबे . ८ वी राज्य स्तरीय तेंग सुडो स्पर्धा २०२१ दिनांक ३०-३१ ऑक्टोबर रोजी नाशिक मध्ये पार पडली . त्यात समर्थ तांबे याने एकूण तीन प्रकारात ०२ गोल्ड मेडल व ०१ सिल्वर मेडल पटकावले आहेत . या स्पर्धेतील समर्थ हा सर्वात लहान वयाचा खेळाडू होता . नवघर रोड , भाईंदर पूर्व इथे राहणारा समर्थ तांबे याने वयाच्या ०३ वर्षांपासून कराटेचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली त्यात त्याला लाभलेले गुरु मास्टर विनोद कदम यांचे मार्गदर्शन व त्याचे वडिल वैभव तांबे यांच्या पाठींब्यायामुळे एवढ्या लहान वयात तो हि कामगिरी पार करू शकला समर्थ याने आता पर्यंत १० गोल्ड, १७ सिल्वर, ०३ ब्रॉंज मेडल पटकावले आहेत. समर्थ तांबे यास पुढील उज्ज्वल भविष्यासाठी पोलीस बातमी पत्र कडून खूप साऱ्या शुभेच्छा .
