दिनांक :- २३/०८/२०२१ मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नालासोपारा पोलीस ठाणेच्या हददीत दिनांक २१/०८/२०२१ रोजी सकाळी ११:०० ते ११.३० वा. च्या सुमारास चंद्रेश पॅलेस, शॉप नं. ०७, नालासोपारा (पश्चिम) येथील साक्षी ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी इसमांनी प्रवेश करुन नमुद दुकानातील ज्वेलर्स मालक किशोर मांगीलाल जैन, रा. एच/१०३, जय इंद्रपस्थ सो. नालासोपारा (प) यांचे दोन्ही हात सेलो टेपने बांधून त्यांच्या डोक्यात व शरीरावर कोणत्यातरी धारदार हत्याराने गंभीर दुखापत करुन त्यास जिवे ठार मारुन दुकानातील दागिने चोरी करून पळून गेले. याबाबत नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाच्या घटनास्थळी मिरा- भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी तात्काळ भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे तात्काळ गुन्हा उघडकिस आणुन आरोपी अटक करण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष १, २, ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध वसई कक्ष तसेच परिमंडळ २ व ३ अंतर्गत येणा-या नालासोपारा, विरार, तुळींज, वालीव, माणिकपूर, अर्नाळा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी १५ पथके तयार केली व त्यांना गुन्ह्यांचा तपास करण्यास पाठविले सदर पथकाने आरोपीनी गुन्ह्याच्या ठिकाणी कुठलाही पुरावासोडलेला नसताना गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने दोन अनोळखी आरोपी यांची ओळख पटवून त्यांची संपुर्ण नावे निष्पन्न केली. त्यातील १) पुरुष आरोपी, वय ३३ वर्षे, धंदा – इलेक्ट्रीशियन, रा. रु. नं.१५/बी, भाईंदर पुर्व, २) पुरुष आरोपी वय ४२, धंदा – इलेक्ट्रीशियन, रा. रु. नं.१०९, जिवदानी निवास, नालासोपारा, यांना दिनांक २३/०८/२०२१ रोजी नालासोपारा पुर्व येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला असून गुन्हा घडल्यापासून अवघ्या ४८ तासाच्या आत गुन्हयाची उकल करुन आरोपीना जेरबंद करण्यात नालासोपारा पोलिसांना यश आले.
सदरची कारवाई ही मा. श्री. सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मा. श्री. एस. जयकुमार, अपर पोलीस आयुक्त, मा.डॉ. श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. प्रशांत वांघुडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, विरार, मा. श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), मा. श्री. चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुपे, पोनि. बडाख, पोनि. कुराडे, पोनि. रणवरे, पोनि. चौधरी, सपोनि. सरक, सपोनि. जगताप, सपोनि/ फडतरे, सपोनि/ सानप, सपोनि/ पालांडे, सपोनि. गुर्जर, सपोनि. कांबळे, सपोनि. बेंद्रे, सपोनि. तळेकर, सपोनि. म्हस्के, सपोनि. स्वामी, सपोनि. आंबवणे, पोउपनि. विचारे, पोउपनि. खाडे, पोउपनि. टेलर, पोउपनि. भागवत व अंमलदार यांनी उत्कृष्टपणे कामगिरी केलेली आहे.सदर गुन्ह्याचा तपास श्री. विलास सुपे, व.पो.नि नालासोपारा पोलीस ठाणे हे करत आहेत.
