दिनांक २०/०९/२०२१ रोजी विष्णुनगर पोलीस ठाणे येथे एका अल्पवयीन मुलीचे वडील आपल्या मुलींला जिचे वय १३ असून तिला फूस लावून तिचे अपहरण करण्यात आले आहे अशी तक्रार घेऊन आले त्यानुसार तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास हा विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पंढरीनाथ भालेराव सो व पोलीस निरीक्षक श्री. खंदारे सो यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार पोउपनिरी/घनश्याम बेंद्रे व गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे यांनी अल्पवयीन मुलीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसतांना तांत्रिक विश्लेषनाच्या मदतीने व गुप्त बातमीदार मार्फतीने आरोपी अक्षय तुकाराम महाडीक, वय २१ वर्षे, राह. काल्हेर, ता.भिवंडी, जि.ठाणे, यास ताब्यात घेण्यात आले व त्याची चौकशी केली असता सदर मुलीस त्याने फूस लावून आपल्या घरी घेऊन आल्याचे व सध्या ती मुलगी तिथेच असल्याचे त्याने कबूल केले त्यानुसार अल्पवयीन मुलीस आरोपीने सांगितल्यानुसार त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप देवुन वरील आरोस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई हि श्री. सचिन गुंजाळ सो, पोलीस उप आयुक्त परी मंडळ ३ कल्याण, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. जयराम मोरे सो डोंबिवली विभाग व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंढरीनाथ भालेराव यांचे मार्ग दर्शनाखाली स.पो.नि. गणेश वडणे, पोना. तुळशीराम लोखंडे, पोना. सचिन कांगुणे यांनी सदरची करवाई यशस्वी पणे पार पाडली आहे.
