भाईंदर : दिनांक २५/०२/२०२२ रोजी वय १५ वर्ष ह्या अल्पवयीन मुलीस आरोपी फैजल याने त्याच्या टेम्पोतुन राऊंड मारतो असे अमिष दाखवून टेम्पोत बसवुन तीस बादशहा गार्डन, भाईंदर (पु.) येथुन नालासोपारा फाटा, नालासोपारा (पु.) येथील पत्र्याचे शेडमध्ये घेवून आला व रात्री ११ च्या सुमारास तिच्यावर जबरदस्ती केली व तिच्याकडून मोबाईल काढुन घेवुन झालेला प्रकार कोणास सांगितल्यास जिवे ठार मारेल अशी धमकी तिला दिली . झालेल्या प्रकाराबद्दल मुलीने पेल्हार पोलीस ठाणेत हजर राहुन तक्रार दिली त्यावरून आरोपी वर पोलिसठाण्यात दिनांक २७/०२/२०२२ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीस अटक करण्याच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयाच्या घटनास्थळावर भेट देवुन, घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक माहीती व गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे आरोपीचा कसोशिने शोध घेवुन आरोपीत मोहमद फैजल सरवर, रा. नालासोपारा पुर्व, ता. वसई यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवुन दिनांक २७/०२/२०२२ रोजी सदर गुन्हयात अटक केली आहे. सदर आरोपीताबाबत पिडीत मुलगी हिस काहीएक माहिती नसतांना घटनास्थळावर मिळालेल्या तांत्रिक माहितीचे आधारे नमुद आरोपीस पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्याने ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी श्री. प्रशांत वाघुडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, विरार, श्री. रामचंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, विरार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे, श्री. महेंद्र शेलार, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि/सनिल पाटील, पोहवा/योगेश देशमुख, तुकाराम माने, पोना/तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, पोअं/संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
