काशिमीरा : अल्पवयीन मुलीचे कौमार्यभंग करण्याच्या बोलीवर सौदा ठरवून मोठी रक्कम स्विकारतांना छापा कारवाई करुन पिडित मुलीची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश.
अधिक माहितीनुसार दिनांक ०८.०६.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- भाईंदर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, महिला वेश्यादलाल निकीता (बदलेले नांव) व तीचा साथीदार सोनु रा. दहिसर हे वेश्यागमनाच्या मोबदल्यात गि-हाईकांना मुली पुरवित असुन कौमार्यभंग करण्यासाठी अल्पवयीन मुलीला घेवुन २,००,०००/- रुपयात सौदा करण्यासाठी दारास ढाबा, मुंबई अहमदाबाद महामार्ग, काशिमीरा येथे येणार आहेत.
मिळालेल्या बातमीच्या कायदेशीर बाबींची पुर्तता करुन पोनि. हंडोरे यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना दारास ढाबा, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, काशिमीरा येथे पाठवुन सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दिनांक ८/६/२०२२ रोजी. छापा टाकला असता महिला वेश्यादलाल १) निकीता (बदलेले नांव) वय-२१ वर्ष, तिची मावशी २) पायल (बदलेले नांव), वय४५ वर्ष, व फरार ३) सोनु रा. दहिसर यांनी आपसात सगंमत करुन १५ व १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलींचे कौमार्यभंग करण्याच्या बोलीवर बोगस पुरुष गि-हाईकाकडुन २,००,०००/- रुपये रक्कम ठरवून त्याच्याकडून ती रक्कम स्विकारताना पोलीसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे . त्याचप्रमाणे पोलिसांनी ०२ अल्पवयीन आणि १ पिडित मुलगी अशा एकुण ०३ मुलींची सुटका करण्यात आली आहे. सदर बाबत तेजश्री शिंदे, महिला सहा.पोलीस निरीक्षक यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपी यांच्या विरुध्द काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री देविदास हंडोरे, सपोनि तेजश्री शिंदे- भरोसा सेल, सपोउपनि उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पोशि/केशव शिंदे, व चा.पोना/ गावडे नेम- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर तसेच पोहवा/धनाजी इंगळे, पोहवा/घरबुडे नेम- अंमली पदार्थ विरोधी कक्ष व मपोना/ कवळे यांनी केली आहे.
