दिनांक २५/०८/२०२ रोजी रात्री ०४.०० वाजता अर्नाळा पोलीस ठाणे हद्दीतील खंबाळा गावात पाटील यांचे घरासमोरील वरांड्यात काही इसम जुगार खेळत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. मिळालेल्या माहीतीच्या आधारे छापा टाकला असता आरोपी १) विकास नाना पाटील वय-३४ वर्षे रा-खंबाळा पाटील गाव विरार प. २)आकाश महिंद्र पाटील वय-२० वर्षे ३) समीर यशवंत पाटील वय-२८ वर्षे ४) चिराग विनरे पाटील वय-२८ वर्षे ५) मयुर प्रदिप पाटील वय-१८ वर्षे ६) संजय दिपक भोईर वय–२९ वर्षे ७) भावीक विनोद पाटील वय-१८ वर्षे ८) प्रशांत भगवान भोईर वय-३१ वर्षे सर्व रा-खंबाळा पाटील गाव विरा प.ता.वसई जि. पालघर यांनी तिन पत्ते जुगाराची साहित्य आपल्या कब्जात बेकायदेशीररित्या बाळगुन स्वत:चे फायद्याकरिता तिन पत्ते नावाचा जुगार खेळत असतांना ८,४१०/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह मिळुन आले म्हणुन अर्नाळा पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. ाा २९४/२०२० भा.दं.वि.सं.कलम १८८ आपत्ती व्यवस्थापन अधि २००५ चे कलम ५१(ब) सह मुंबई जुगार अधिनियम ४ (ब) व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे.
सदरची कारवाई ही अर्नाळा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक/श्री.महेश शेटये यांचे मार्गदर्शनाखाली अर्नाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
