मिरारोड : धिरेंद्र श्रीकृष्णजी शास्त्री उर्फ बागेश्वरधाम सरकार यांच्या कार्यक्रमात नागरिकांच्या गळयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करुन मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले परत.अधिकमाहितीतनुसार दिनांक १८/०३/२०२३ व दिनांक १९/०३/२०२३ रोजी मिरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. के. स्टोन कोस्टल पोलीस चौकीच्या मागे असलेल्या मोकळया मैदानात बागेश्वरधामवाले बाबांचे प्रवचन होते त्या कार्यक्रमासाठी आलेले पुरुष व महिला (प्रत्येक दिवशी अंदाजे १ ते १.५० लाख) भाविकांपैकी सुमारे ६० महिला व ०१ पुरुष यांच्या गळयातील सुमारे ९९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयांनी आपसात संगणमताने जबरीने चोरी करुन नेले होते त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्याने मिरारोड पोलीस ठाणेत जबरी चोरीचे ०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदर दाखल गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा व मिरारोड पोलीस ठाणे यांनी केलेला आहे. सदर गुन्हयांच्या तपासात कार्यक्रमाचे ठिकाणाहून स्थानिक नागरिकांनी दिलेली माहिती, मोबाईलचे तसेच घटनास्थळावरील व अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सी. सी. टी. व्ही. फुटेजचे तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हे करणारे आरोपी हे राजस्थान मधील भरतपुर व अलवर जिल्हयातील राहणारे असुन, यातील आरोपी महिला व पुरुष हे धार्मिक / राजकीय / सामाजिक कार्यक्रमाचे ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन ज्या इसमांची चोरी करायची आहे त्यांच्या भोवती गराडा करुन त्यांच्या गळयातील मंगळसुत्र, चैन, हार असे दागिण्यांची चोरी करुन त्यांचे पैकी म्होरक्या असलेल्या पुरुष/महिलाकडे चोरी केलेले दागिणे देतात व ज्याच्याकडे दागिणे दिले जातात तो म्होरक्या गावी निघुन जातो तर इतर चोरी करणारे पुरुष व महिला हे पुन्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी त्याच प्रकारे चोरी करतात हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले.
पोलिसांना तपासामध्ये महिला व पुरुष याचा समावेश असल्याचे तसेच त्यांनी येण्याजाण्यासाठी वाहनांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले तसेच हे आरोपी सराईत दरोडे, जबरी चोरी सारखे भयानक गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याने त्यांना अटक करुन गेलेला माल हस्तगत करणे अतिशय जोखमीचे कर्तव्य होते. यासाठी मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त मि.भा.व. वि. यांचे आदेशान्वये गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीरा व मिरारोड पोलीस ठाणे यांची ०४ विशेष पोलीस पथके तयार करुन सदरची विशेष तपास पथके ही अंदाजे ३० दिवस भरतपूर, अलवर जिल्हयातील धोकादायक परिसरात राहुन, जोखीम पत्करुन, स्थानिक पोलीसांचे सहकार्याने आरोपी १) गितादेवी सरदार सिंह २) सेटू करमबीर सिंग ३) अर्जुन सिंग बिरेंद्र बावरीया, तिनही रा. रुंध इकरन, ४) हेमा उर्फ हिरोदेवी सुरज, राह. सिरावास, जि. अलवर, राजस्थान ५) पिंकी सुर्यप्रताप सिंग ऊर्फ राहुल, राह खेरथल, जि. अलवर राजस्थान ६) रेशमा हिराराम बावरीया उर्फ संत्रा बिरेंदर बावरीया बस्ती, जि. झुनझुनु, राजस्थान, ७) सोनिया अनिल कुम्हार, भोरा कॉलनी, जि. अलवर, राजस्थान ८) रंजीत कुमार उर्फ प्रविण कुमार जगदीश प्रसाद बावरीया, राह. भोगाँव, बिछवा पोलीस ठाणे, मैनपुरी, उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवुन केलेल्या तपासामध्ये वर नमुद आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला ५०,००,०००/- रुपये किंमतीचे ७८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व लगडी असा मुद्देमाल हस्तगत करुन मिरारोड पोलीस ठाण्यात प्रवचन कार्यक्रमादम्यान घडलेल्या प्रकारामुळे दाखल असलले जबरी चोरीचे सर्व गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी अटक आरोपींकडून जप्त केलेला मुददेमाल आज दिनांक १२/०५/२०२३ रोजी शहनाई हॉल, मिरारोड पुर्व येथे घेण्यात आलेल्या मुददेमाल हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान मा. श्री. मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त यांच्या हस्ते कायदेशिर बाबींची पुर्तता करुन परत करण्यात आल्याने संबंधित फिर्यादी यांनी मिरा- भाईदर, वसई-विरार आयुक्तालयाचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.
सदरची कामगिरी श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली मिरारोड पोलीस ठाणेचे व. पो. नि. श्री. विजयसिंह बागल, गुन्हे शाखा, युनिट १, काशिमीराचे पोनि. श्री. अविराज कुराडे, सपोनि. कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, व अंमलदार तसेच मिरारोड पोलीस ठाणेचे सपोनि. हानिफ शेख, पोउपनि किरण वंजारी व अंमलदार तसेच राजस्थानमधील भरतपूर व अलवर येथील स्थानिक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
