वसई : एका ११ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्या-या नराधमास वसई पोलिसांनी १२ तासाच्या आत अटक केली आहे. मिळालेल्या माहिती नुसार दिनांक १५/०५/२०२२ रोजी मुलीच्या वडिलांनी त्यांची मुलगी संध्याकाळी ४. ०० वाजता खेळायला जाते सांगून घरातुन निघून गेली ती परत आलीच नाही त्यामुळे तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती.
सदर गुन्ह्यांचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी मुलीचा शोध घेतला असता ती मुलगी दि. १५ ला रात्री ३. ३० च्या सुमारास पोलिसांना सापडली तिची महिला पोलीस अंमलदारा यांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता समजुन आले की, एका अनोळखी इसमाने तिला वसई स्टेशन येथून अपहरण करून तेथून एका ठिकाणी घेवून जावून तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केले. मिळालेली माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना कळविले असता त्यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ ४ पथके तयार करण्यात आली. व सदर पिडीत मुलीने सांगीतल्याप्रमाणे वसई पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सर्व घटनास्थळाचे बारकारईने पाहणी करुन व तांत्रिक कौशल्याचा वापर करुन जलदगतीने तपास केला आरोपी आरिफ अय्युब शेख यास १२ तासाच्या आत दि. १५/०५/२०२२ रोजी ताब्यात घेवून सदर गुन्हयात अटक करण्यात वसई पोलिसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी श्री. संजयकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-२ वसई, श्री. प्रदिप गिरीधर, सहा.पोलीस आयुक्त, वसई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे, श्री. ऋषिकेश पवळ, पोलीस निरिक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/सुनिल पवार, सपोनि/राम सुरवसे, पोउपनिरी/विष्णु वाघमोडे, मपोउपनिरी/वृषाली थिटे, पोहवा सुनिल मलावकर, पोअं. बाळु गर्जे, अमोल पाटील, भालेराव यांनी केलेली आहे.
