(दि. २० )मिरारोड : सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार वर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.अधिक माहितीनुसार दिनांक १९.०४.२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार, मिरा-भाईंदर रोड, मिरारोड पूर्व, ता. जि. ठाणे या बारच्या हॉलमध्ये महिला सिंगरच्या नावाखाली परवाना नसताना महिलांकडुन नृत्य करवुन घेतले जाते व सदर बारचे चालक/मालक, मॅनेजर, कॅशिअर, स्टीवर्ड, वेटर, वादक / सिंगर हे मुलींना नृत्य करण्यास प्रोत्साहीत करुन नृत्य करण्यास भाग पाडत आहेत.
य़ा माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो. नि. श्री. समीर अहिरराव यांनी कायदेशीर बाबीची पुर्तता करुन बोगस गि-हाईक पाठवून सत्यता पडताळुन सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बार, मिरारोड पूर्व या ठिकाणी पोलीस पथक व दोन पंचासह दिनांक २०.०४.२०२३ कारवाई केली असता सोना पॅलेस (भार्गव पॅलेस) ऑर्केस्ट्रा बारमध्ये हिंदी गाण्याच्या व वाद्याच्या तालावरती महिला सिंगर अश्लिल नृत्य करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. तसेच ऑर्केस्ट्रा बारचे चालक/ मॅनेजर, कॅशियर, वेटर, स्टीवर्ड, पुरुष सिंगर / वादक हे बारमधील महिला सिंगर यांना अश्लिल नृत्य करण्यास बंदी असताना देखील नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहीत करीत असल्याचे आढळुन आल्याने पोलिस पथकाने बार मधुन रोख रक्कम ३३,२०० /- रु व चित्रीकरण केलेली क्लीप जप्त करुन नमुद ऑर्केस्ट्रा बारच्या चालक / मॅनेजर-०१, कॅशिअर-०१, वेटर- ०४, स्टीवर्ड-१, पुरुष सिंगर / वादक – ०१ असे एकुण ०८ जणांना ताब्यात घेतले असुन तसेच पाहिजे आरोपी बारचे मालक संजयकुमार गृहनाथसिंग ठाकुर रा. मिरारोड पुर्व व तपासात निष्पन्न होणारे इतर चालक यांचेविरुध्द पो. अंम. केशव शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन मिरारोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररुम) यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणा-या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत, दि.२०.०४.२०२३ रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो. नि. श्री. समीर अहिरराव, स.फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. अंम. केशव शिंदे, चा. पो. हवा. सम्राट गावडे, महिला पो.अंम अश्विनी भिलारे, महिला म. सु. ब. शुभांगी मोकल यांनी केली आहे.
