मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई – तृतीयपंथी महिला वेश्या दलालाच्या जाळयात अडकलेल्या मॉडेलींग व फोटोशुट करणा-या महिलेची वेश्या व्यवसायातुन सुटका करुन, तृतीयपंथी महिला वेश्या दलालास अटक.
दिनांक २९.०४.२०२३ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांना विश्वासनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, तृतीयपंथी महिला वेश्यादलाल नितु रा. अंधेरी, मुंबई हिच्या कडे फोटोशुट व मॉडेलींग करणाऱ्या मुली असुन तिच्या मोबाईल क्रमांकावर पुरुष गि-हाईकाने संपर्क साधला की, ती व्हॉटसऍप व्दारे पुरुष गि-हाईकांना तिच्या परिचयाचे फोटोशुट व मॉडेलींग करणाऱ्या मुलींचे फोटो पाठवुन त्यांच्याशी व्हॉटसऍप व कॉलींग कॉलव्दारे संपर्क करुन ती अंधेरी, मुंबई परिसरात तसेच मिरा-भाईंदर परिसरातील लॉजमध्ये गि-हाईकास रुम बुक करावयास लावुन किंवा गि-हाईकाच्या सोयीनुसार वेश्यागमनाचा मोबदला घेवुन पुरुष गि-हाईकास वेश्यागमनासाठी मुली पुरविते.मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींची पुर्तता करुन अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदरचे पो.नि. श्री. समीर अहिरराव यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना तृतीयपंथी महिला वेश्यादलाल सुचविल्याप्रमाणे वर्धमान फॅन्टासीचे गेटजवळील फुटपाथ, शिवार गार्डन, मिरारोड पुर्व सत्यता पडताळुन पोलीस पथकासह दिनांक २९.०४.२०२३ रोजी छापा कारवाई केली असता तृतीयपंथी महिला वेश्यादलाल नितु उर्फ संजना सिंह हिने बोगस गि-हाईकास फोटोशुट व मॉडेलींग करणारी मुलीचे फोटो पाठवुन तिस वेश्यागमनासाठी प्रवृत्त करुन वेश्यागमनाच्या मोबदल्यात रक्कम ठरवुन, स्वतःच्या उपजिवीकेकरीता रक्कम स्वीकारल्याने तिला पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेवुन ०१ पिडित मुलीची सुटका केली आहे. सदरबाबत स.फौ. उमेश हरी पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन तृतीयपंथी महिला वेश्यादलाल संजना उर्फ नितु सिंह हिच्या विरुध्द मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, श्री. जयंत बजबळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ तथा अति. कार्यभार (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. समीर अहिरराव, स.फौ. उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पो. अंम केशव शिंदे, चा.पो.हवा. सम्राट गावडे, महिला पो. अंम अश्विनी भिलारे, महिला म. सु.ब. अश्विनी वाघमारे, सर्व नेम. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केलेली आहे.
