मिरारोड : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस. एस. पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, वेश्यादलाल आकाश हा पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात अल्पवयीन मुली पुरवितो, अशी माहिती मिळाल्याने वपोनि. पाटील यांनी वरिष्ठांचे परवानगीने बोगस गि-हाईक व पंचांना पाठवून मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळुन दि.२८/८/२०२१ रोजी १४.४० वा. पय्याडे हॉटेलच्या बाजुस नयानगर कडे जाणा-या रोडवर, मिरारोड पूर्व येथे छापा टाकला असता वेशादलाल आकाश जोगेंद्र गौंड वय २८ वर्ष रा. १२९ म्हाडा बिल्डीग, मिरारोड पूर्व हा वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गिहाईकाकडुन पैसे स्विकारुन मुली पुरवित असतांना मिळुन आल्याने त्याला वेश्यागमनाकरीता स्विकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०१ अल्पवयीन व ०१ प्रौढ मुलीची सुटका केली. सदर बाबत वेश्यादलाल आकाश जोगेंद्र गौंड वय २८ वर्ष याचे विरुद्ध नयानगर पोलीस ठाणे येथे पोहवा. उमेश पाटील यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन नयानगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी आकाश जोगेंद्र गौंड वय २८ वर्ष हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचे विरुध्द भाईंदर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर विभागाचे व.पो.नि. श्री. संपतराव पाटील, सपोनि. तेजश्री शिंदे,पोहवा.उमेश पाटील, पोहवा. निलंगे, मपोना. यम्बर, मपोना. कमल चव्हाण, पो.शि. केशव शिंदे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वहातुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर (प.) यांनी केली आहे.
