काशिमीरा : साईशा आयुर्वेदिक वेलनेस सेंटर गाळा नं.०८, ज्योती ब्रिज बिल्डीग, मंगलनगर, हाटकेश, काशिमीरा येथे मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवितात अशी माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेचे वपोनि श्री. एस. एस. पाटील यांना गोपनीय माहीती मिळाल्याने वपोनि. पाटील यांनी बोगस गि-हाईक व पंच यांना पाठवून मिळालेल्या बातमीची सत्यता पडताळुन दिनांक २३/८/२०२१ रोजी ०५.३० वा. सदर ठिकाणी छापा टाकला असता मसाज पार्लर चालविणारा इसम सतिष दयानंद पदमशाली वय ३० वर्ष रा. डी-२१२, रत्नदिप कॉम्प्लेक्स, भाईंदर पश्चिम, व त्याची पत्नी सना मोहम्मद युसूफ दरवेश ऊर्फ सना सतिश पद्मशाली हे मसाजच्या नावाखाली वेश्यागमनाच्या मोबदल्यात पुरुष गि-हाईकांकडुन पैसे स्विकारुन मुली पुरवित असतांना मिळुन आले त्यांना वेश्यागमनाकरीता स्विकारलेल्या रक्कमेसह ताब्यात घेवुन ०२ मुलींची सुटका केली. सदर बाबत वेश्यादलाल सतिष दयानंद पदमशाली व त्याची पत्नी यांच्या विरुद्ध काशिमीरा पोलीस ठाणे येथे पोहवा.उमेश पाटील यांनी सरकार तर्फे काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप.आयुक्त (गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर विभागाचे व.पो.नि. श्री. संपतराव पाटील, सपोनि. तेजश्री शिंदे (भरोसा सेल), पोहवा. उमेश पाटील, पोहवा. निलंगे, मपोना. यम्बर, पो.शि. केशव शिंदे, मपोशि. सुप्रिया तिवले व चालक पो.ना. गावडे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वहातुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर (प.) यांनी केली आहे.
