मिरारोड : दि. १४/०७/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर चे वपोनि . श्री. पाटील व पथक मिरारोड परिसरात पेट्रोलिंग करीत असतानां , सरदार वल्लभभाई पटेल स्कुल समोरील रोडवर, शिवारगार्डन, मिरारोड पूर्व जि . ठाणे या ठिकाणी एक इसम मोटार सायकलचे हॅन्डलला उजव्या बाजूस एक पांढऱ्या रंगांची पिशवी अडकवुन संशयितरीत्या उभा असल्याचे निदर्शनास आल्याने त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव विनयकुमार ब्रम्हदेव पाठक वय :२२ रा. काशिमीरा असे सांगितले . सदर इसमाची व मोटर सायकलचे हॅन्डलला अडकविलेल्या पिशवीची तपासणी केली असता , पिशवीमध्ये ०२ किलो १६ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ मिळून आल्याने सदर बाबत प्राथमिक विचारपुस केली असता, अंमली पदार्थ त्याने त्याचा साथीदार प्रतिक पटेल रा. भाईंदर पूर्व याचे कडुन घेतल्याचे सांगितल्याने लागलीच प्रतिक पटेल याचा भाईंदर पूर्व परिसरात शोध घेवून त्यास ताब्यात घेतले . त्यास त्याचे पत्ता विचारले असता नाव: प्रतिक कनुभाई पटेल वय : २९ रा. भाईंदर असे सांगितले . सदर इसमाचे झडतीमध्ये २ किलो ३७५ ग्रॅम अंमली पदार्थ , गांजा मिळून आला.
वर नमूद दोन्ही इसमाचे ताब्यात एकूण ४ किलो ३९१ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, मोटार सायकल व रोख रक्कम असे एकुण १,६४,८००/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत मिरारोड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री. डॉ . महेश पाटील पोलीस उप.आयुक्त(गुन्हे), श्री. रामचंद्र देशमुख सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) , यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर विभागाचे व. पो. नि . श्री. संपतराव पाटील, पोलीस अंमलदार उमेश पाटील , विजय निलंगे , रामचंद्र पाटील , वैष्णवी यंबर , कमल चव्हाण , केशव शिंदे व चालक सम्राट गावडे यांनी केली आहे.
