मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग समिती क्र. 06 अंतर्गत येणाऱ्या मौजे
काशि येथील ग्रिन विलेज समोरील लोखंडी गेटच्या आत मधील विकासक श्री. मनोज
चव्हाण याचे अंदाजे मोजमाप 10 फुट X 12 फुट मोजमापाचे 10 रुमचे पक्के
अनधिकृत बांधकाम तसेच मौजे काशि येथील सर्वे क्र. 25 हिस्सा क्र. 1 व
सर्वे क्र. 24 हिस्सा क्र. 13,14 या जागेवरील नाल्यालगत असलेले 6 रुमचे
पक्के बांधकाम तसेच मौजे काशि सर्वे क्र. 74 या जागेवरील अंदाजे 10000
चौफुटाचे लोखंडी एँगल व ताडपत्रीचे शेडचे बांधकामावर आज दि. 03/09/2020
रोजी पोलीस बंदोबस्तात, जेसीबीद्वारे कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई श्री. विजय राठोड, मा. आयुक्त सो. श्री अजित मुठे, मा.
उप-आयुक्त सो., अतिक्रमण विभाग श्री. नरेंद्र चव्हाण, मा. विभागप्रमुख,
अतिक्रमण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सर्व प्रभाग अधिकारी,
कनिष्ठ अभियंता, व अधिनिस्त कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात मनुष्यबळाचा
वापर करुन सदरचे बांधकाम जे.सी.बी.च्या सहाय्याने तोडण्यात आले.
