मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार मीरा भाईंदर महानगर पालिकेतील प्रभाग समिती क्र.०४ अंतर्गत आरक्षण क्र.२१४ या ठिकाणी अनधिकृत गॅरेज वर दिनांक: २१/०१/२०२१ रोजी कारवाई अंतर्गत तोडण्यात आला.
सदर कारवाईच्या वेळी विभाग प्रमुख श्री. नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी श्रीमती. कांचन गायकवाड़, कनिष्ठ अभियंता श्री योगेश भोईर, कनिष्ट अभियंता श्री. विकास शेळके, तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,१ जे.सी.बी. व मनुष्यबळाच्या साहाय्याने तसेचग सुरक्षारक्षक आणि पोलीस बंदोबस्ताखाली करण्यात आले होते.
