मिरारोड: दिनांक २६.०२.२०२२ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध भाईंदर पथकाचे पोहवा/उमेश पाटील यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरा-भाईंदर परिसरात काही बांगलादेशी नागरीक अनधिकृतपणे राहत असून मजुर म्हणुन काम मिळण्यासाठी रसाज थिएटर, मिरारोड पुर्व येथे एकत्र जमा होतात.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक, पंच व दुभाषिक यांच्यासह वरील नमुद ठिकाणी साफळा रचुन ०७ स्त्री -पुरुष बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची प्राथमिक विचारपूस केली असता, ते पारपत्र व व्हिजाशिवाय अनधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्या विरुध्द पोहवा/उमेश हरी पाटील, नेम. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नयानगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई डॉ. श्री महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि. श्री. संपतराव पाटील, पो.हवा./उमेश पाटील, पोहवा/विजय निलंगे, पोहवा/ रामचंद्र पाटील, पोशि/ केशव शिंदे, मपोना/वैष्णवी यंबर, चा.पोना/ गावडे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
