दिनांक १३/११/२०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, नयानगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात भारत पेट्रोल पंपाचे जवळ, गोंविद नगर परिसरात काही बांगलादेशी नागरिक अनधिकृतपणे वास्तव्य करत आहेत.मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक, पंच व दुभाषिक यांचेसह वरील नमुद ठिकाणी छापा कारवाई करुन ०९ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपूस केली असता, ते पारपत्र व व्हिजा शिवाय अनाधिकृतपणे वास्तव्य करीत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर नयानगर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. संपतराव पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, पो.हवा. उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पो.ना. गावडे, पो.अं. केशव शिंदे, सुप्रिया तिवले, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.
