दिनांक : ०५/१०/२०२१ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका, प्रभाग समिती क्र. ६ कार्यक्षेत्रात मौजे-घोडबंदर, सर्वे क्र. १६९/१, १७०/१०, डाचकुलपाडा येथील मोकळी जागेतील पत्रा व बाबूंच्या सहाय्याने एकुण ३५ अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम, डाचकुलपाडा येथिल जांगीड लाकडी प्लायवूड कारखान्यावर अंदाजे २० मी x ६० मी मोजमापात लोखंडी अँगल पत्रा व विट बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे.मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून गेल्या काही आठवड्यापासून अशी अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली जात आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त (अतिक्रमण विभाग) मारुती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रभागातील अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत उपायुक्तांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, गॅरेजेस, पदपथावरील व्यावसायिक, अनधिकृत होर्डिंग्ज, अनधिकृत झोपड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.
सदरची कारवाई आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सहा. आयुक्त स्वप्निल सावंत, सहा. आयुक्त चंद्रकांत बोरसे, कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, कनिष्ठ अभियंता दुर्गेदास अहिरे, कनिष्ठ अभियंता सुदर्शन काळे, कनिष्ठ अभियंता योगेश भोईर, कनिष्ठ अभियंता विकास शेळके, कनिष्ठ अभियंता संजय सोनी, कनिष्ठ अभियंता वैभव पेडवी, कनिष्ठ अभियंता संदिप जटालकर, फेरीवाला पथक प्रमुख वसंत पेंढारे, फेरीवाला पथक प्रमुख भैरु नाईक तसेच अतिक्रमण विभागाचे पोलीस कर्मचारी, व सर्व प्रभागाचे महाराष्ट्र सुरक्षा बल जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, ठेका मजुर यांच्या उपस्थितीत व २ जेसीबीच्या सहाय्याने सदर कारवाई करण्यात आली.
