अकोला : सोयाबिन चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी सोयाबिन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकुण ४३,६१,०००/-रुपये चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे तसेच आरोपींना या गुन्ह्यात मदत करणाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०२/०४/२०२२ रोजी गुजरात अंबुजा तेल कंपनीतील मॅनेजर याने त्यांच्या येथून अंदाजे ३२५ क्विंटल सोयाबीन माल चोरी गेल्याचे बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन मा.पो.अधिक्षक सा. यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोउपनि. मुकुंद देशमुख, पोहेकॉ. दत्ता ढोरे, पोकॉ. संदिप ताले, श्रीकांत पातोंड व रवि पालीवाल यांच्याकडे सोपवून एक पथक तयार केले .या पथकाने दि. ३ एप्रिल रोजी आरोपींचा शोध घेत असतांना पोलिसांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, शेगाव जि.बुलढाणा येथील राहणारा विठ्ठल पंजाबराव मेहंगे वय २७ वर्ष, याने गुजरात अंबुजा फॅक्टरी मधुन सोयाबिन चोरी केले आहेत तसेच सहकाऱ्यांच्या मदतीने पोलीस ठाणे हद्दीमधून सोयाबिन चोरी करून मालवाहू वाहनाने सोयाबिन माल त्यांचा राहत्या घरी घेउन गेला आहे, अशी बातमी मिळाल्याने सदर माहिती मा. पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शना प्रमाणे तपास पथक रवाना केले असता शेगाव येथुन १)विठ्ठल पंजाबराव मेंहंगे वय २७ वर्ष २)देवानंद पंजाबराव मेहंगे वय २४ वर्ष, ३) अविनाश बाळकृष्ण मेहंगे वय २१ वर्ष, सर्व रा. शेगाव यांना ताब्यात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी हि चोरी सहका-यांचे मदतीने सोयाबीन माल विविध ठिकाणा वरून चोरी केल्याचे सांगीतले. तसेच घरासमोर उभे असलेले सोयाबिन मालाचे कट्टयाने भरलेले मालवाहु वाहनाची विचारपूस केली असता सदरचा सोयाबीन माल हा गुजरात अंबुजा सोयाबीन फॅक्टरी मधुन ६ वेळा चोरी केलेला आहे अशी कबुली त्यांनी दिली त्यांचा अजून काही चोरीचा गुन्हा दाखल आहे का हे तपासले असता त्यांच्यावर अश्या प्रकारचे पोलीस ठाणे बाळापूर येथे तिन गुन्हे, १)पो.ठा .बार्शिटाकळी २) पो.ठा . बोरगाव मंजु ३)पो.ठा पिंजर येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे एकुण ६ गुन्हयातील चोरी गेलेले १) सोयाबिन माल ४३० क्विंटल किंमत २८,१३,000/-रू व गुन्हयात वापरलेले मालवाहु वाहन किंमत ५,00,000/-रू त्याचप्रमाणे या गुन्ह्यात त्यांना सहकार्य करणारा ३) अनिल त्रंबक घुगे वय ३० वर्ष, यास देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकुण – ४३,६१,000/- रूपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोयाबिन चोरीचे टोळीतील सर्व आरोपी हे वाशिम व बुलढाणा जिल्हयातील असल्याचे पोलीस तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे. पुढील तपासासाठी आरोपी यांना बाळापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राउत मॅडम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि. मुकुंद देशमुख, पोहेकॉ. दत्ता ढोरे, पोकॉ. श्रीकांत पातोंड, संदिप ताले, रवि पालीवाल, ओएसआय. गोपीलाल मावळे, शेर अली, महिला पोहेकॉ. अनिता टेकाम, चालक नापोकॉ. अक्षय बोबडे, पोकॉ. विजय कबले स्थागुशा अकोला यांनी केली.
