अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई-मिरारोड येथे अंमली पदार्थ विकणाऱ्या आरोपींस अटक .
दिनांक २१/१०/२०२१ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस अंमलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, मिरारोड (पुर्व), पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या सर्विस रोडवर प्युमा शोरुम समोर एक ईसम चरस हा अंमली पदार्थ करणाऱ्या विक्री करीता येणार आहे.सदर मिळालेल्या बातमी वरिष्ठांना कळवुन त्यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस पथकाने छापा कारवाई केली . सदर कारवाई दरम्यान एकुण ७२ ग्रॅम वजनाचा ५४,०००/-रु. किंमतीचा चरस नावाचा अंमली पदार्थ सेनवाद दिनमोहम्मद लखानी रा. वोवा, मुंबई मुळ रा. भावनगर, राज्य-गुजराथ यांच्या जवळ मिळुन आला. सदर अंमली पदार्थ (चरस) जप्त करण्यात आलेला असुन नमुद अंमली पदार्थ त्यास विक्रीकरीता पुरविणारे जय हरीश सोमय्या रा. मालाड (पश्चिम) मुंबई व मोहम्मद अनीस अबुबकर रहमान रा. वर्सेवा गाव, मुंबई मुळ रा. गोंडल, राज्य-गुजराथ यांना ताब्यात घेउन कारवाई करण्यात आली आहे. आरोपी जय हरीश सोमय्या हा अंमली पदार्थ तस्करी करणारा आंतरराज्यीय सराईत गुन्हेगार आहे. नमुद आरोपीविरुध्द काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास काशिमीरा पोलीस ठाण्याकडुन चालु आहे.
सदरची कारवाई श्री. अमित काळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१, श्री. अमोल मांडवे सहा. पोलीस आयुक्त, (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक श्री. देवीदास हंडोरे, सहा. पोलीस निरीक्षक, विलास कुटे, मसपोनि. तेजश्री शिंदे नेमभरोसा सेल, पो.हवा. धनाजी इंगळे, पोना. पवन पाटील, विनोद राउत, पोशि. अजय यादव, विष्णुदेव घरबुडे यांनी केली आहे.
